Sanjay Raut Latest Marathi News, Maharashtra Political Crisis Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'गुजरातमधून ड्रग्ज पुरवठा, नाशिकच्या आजी- माजी पालकमंत्र्यांचा सहभाग...' राऊतांचे गंभीर आरोप

Sanjay Raut Latest News: पंजाब, गुजरातनंतर आता उडता नाशिक होत आहे... असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी

Sanjay Raut News:

राज्यात सध्या ड्रग्जमाफिया ललित पाटील हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. त्यानंतर ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन समोर आले होते. नाशिकमधून मोठा ड्रग्जसाठाही जप्त करण्यात आला होता. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

राज्यात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. पंजाब, गुजरातनंतर आता उडता नाशिक होत आहे. शाळा कॉलेज परिसरात याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांसह नाशिकचे (Nashik) आजी आणि माजी पालकमंत्रीही सहभागी आहेत, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले.

ठाकरे गट काढणार विराट मोर्चा...

याबाबत पुढे बोलताना संजय राऊत यांना फडणवीस गृहमंत्री झाल्यावर गुन्हेगारी वाढली. मात्र नाशिक शहराला आम्ही ड्रग्जची वाळवी लागू देणार नाही, नाशिकचा नागपूर होऊ देणार नाही, असे म्हणत ड्रग्जप्रकरणाविरोधात 20 ऑक्टोबरला ठाकरे गट नाशिकमध्ये विराट मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT