Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: टोल माफीच्या निर्णयात मोठा घोटाळा, संजय राऊतांचे गंभीर आरोप, भाजप- राष्ट्रवादीवर हल्लाबोल!

Maharashtra Assembly Election 2024: एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा खेळ आहे भारतीय जनता पक्ष मदारी आहे आणि हे सर्व माकड आहेत हे आता त्या तालावर माकडांना नाचवणार.. असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रामध्ये 26 तारखेला नवीन सरकार स्थापन होईल आणि ते सरकार महाविकास आघाडीचा असेल याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. सरकार आम्हीच स्थापन करणार, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

"आज आणि उद्या दोन दिवस बैठका सत्र सुरू राहतील आणि बरेच चित्र स्पष्ट होईल. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. त्यावरुन आम्हाला आता जागा वाटपासंदर्भात चर्चेला ब्रेक लावावा लागेल. आज माझी माननीय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होईल शरद पवार यांच्याशी चर्चा होईल काँग्रेस नेते आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही तिघेही ठराव कोणत्या दिवशी जागा जाहीर करायचे लवकरात लवकर करावे लागेल", असे संजय राऊत म्हणाले.

"अमित शहा आणि भाजप यांनी कोणताही त्याग केला नाही. अमित शहा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता अमित शहा यांना शिवसेना तोडायची होती, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला जातो त्यासाठी शिंदे यांचा वापर केला. त्याग आणि बलिदान हा शब्द भारतीय जनता पक्षाला शोभत नाही, हा अपमान आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना जुळवून घ्यायला सांगितले त्याला त्याग नाही स्वार्थ बोलतात. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा खेळ आहे भारतीय जनता पक्ष मदारी आहे आणि हे सर्व माकड आहेत हे आता त्या तालावर माकडांना नाचवणार," असा टोलाही राऊतांनी लगावला.

"राज्यपाल नियुक्त आमदारांनी घेतलेली शपथ बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. घाई घाईने आचारसंहिता लगायच्या आधी पाच तास आधी निर्णय घेतला. वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करतात आणि त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. तुम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रवादावर पिपाण्या वाजवायची गरज नाही.." अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

"टोलमाफीचा निर्णय हा कोरडा पाऊस आहे ढग गडगडले पाणी कुठे? टोल माफीच्या संदर्भात जो निर्णय झाला तो मोठा घोटाळा आहे. मुदतीआधी टोलमाफी केल्यामुळे शेकडो रुपयांचा परतावा करावा लागणार आहे. त्यामधील 50% शिंदे गट भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या वाटेला जाणार आहेत. हे एक पडदा मागील सूत्र आहेत. राज्याच्या तिजोरीतील पैसे आता या टोल धारकांना द्यावे लागतील.. असे गंभीर आरोपही संजय राऊतांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाचा धुडगूस

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुणीच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

Maharashtra Weather Alert: ऐन दिवाळीत पावसाने घातला धुमाकूळ; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT