Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'आंबेडकरांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही...'; शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावर राऊत स्पष्टचं बोलले

Maharashtra Politics: आता संजय राऊत यांनी या बाबत ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट मांडली आहे.

Ruchika Jadhav

Political News: राज्यात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होऊन फक्त ४ दिवस झाले आहेत. मात्र आताच प्रकाश आंबेडकारांवरून राजकारणात धुसफूस सुरू असलेली दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युती केल्यानंतर लगेचच शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील नेते मंडळी देखील प्रकाश आंबेडकरांचा चांगलाच समाचार घेत आहेत. अशात आता संजय राऊत यांनी या बाबत ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. (Latest Political News)

आज माध्यामांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, " प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडकरांनी एकत्रीतरित्या माध्यमांसमोर हे जाहिर केले होते. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेलं विधान आम्हाला अजिबात मान्य नाही."

शरद पवार हे माहराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकरांनी केलेलं वक्तव्य पवारांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आरोप आहे. जर ते भाजपचे असते तर त्यांनी अडीच वर्षाआधी भाजपला दूर ठेऊन महाविकास आघाडीचे सरकार होऊन दिले नसते. जेव्हा केव्हा विरोधी पक्षांच्या एकीचा विषय असतो तेव्हा शरद पवारांचे नाव आग्राहाने घ्यावे लागते. कारण सर्व विरोधी पक्षांना तेच एकत्र आणू शकतात. त्यामुळे त्याच्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावे, असा इशारा संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

युती झाल्यावर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीका करण्यास सुरूवात केली. 'शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल', असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने राष्ट्रावादीतील अनेक नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT