Ajit Pawar - Sharad Pawar News  Saam TV
महाराष्ट्र

Saamana Rokhthok : शरद पवार-अजित पवार यांच्यात गुप्त भेट कशासाठी?, संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून मोठा दावा

Saamana Rokhthok Sharad Pawar-Ajit PAwar Meeting : सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्य़ांनाच पडेल.

प्रविण वाकचौरे

Mumbai News : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर शरद पवार समर्थक आणि अजित पवार समर्थक असे दोन गट पक्षात पडले. मात्र पक्षफुटीनंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटींमुळे सर्वांमध्येच संभ्रमाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना त्यांच्यातील गुप्त भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे. या भेटीचे अनेक तर्क लावले जात आहे. यात भर म्हणजे सामनाच्या 'रोखठोक'मध्ये अजित पवार याणि शरद पवार यांच्या भेटीचं कारण सांगण्यात आलं आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीचा विषय आता मागे टाकायला हवा. दोन नेत्यांमधील भेट राजकीय नसावी. शरद पवार यांनी राज्यात अनेक मोठ्या संस्था उभ्या केल्या. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रात त्या काम करतात. त्या संस्थांवर शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना बसवले. मात्र पक्षफुटीनंतर आता पुढे काय, हा प्रश्न आहे. पवारांच्या हयातीत अजित पवारांनी त्यांच्या पक्षावरच दावा सांगितला, तेथे संस्थांचे काय? असा प्रश्नही रोखठोकमधून उपस्थित करण्यात आला आहे. (Political News)

...तर अजित पवार कोण?

अजित पवार हे आज राजकारणातले बलवान नेते आहेत; पण सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्य़ांनाच पडेल. अजित पवार यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. आजच्या शिखरावर नेऊन बसवले. त्या शिखरावरून त्यांनी शरद पवार यांनाच ढकलण्याचा प्रयत्न केला.

सहकार संस्थांचे भवितव्य काय?

पक्षफुटीनंतर शरद पवार-अजित पवार यांच्यात संवाद होतो. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण होणारच. शरद पवार व अजित पवार का भेटत आहेत? माझ्या माहितीनुसार या बैठका राजकीय नाहीत तर शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानपासून कृषी, शेती, सहकारासंदर्भात ज्या संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले त्या सर्व संस्थांवर अजित पवार यांना पवारांनी आणले. हजारो शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांचे भविष्य या संस्थांत आहे. संस्थांचे भवितव्य काय हे ठरवण्यासाठी या बैठका असाव्यात, असा अंदाज संजय राऊत यांनी रोखठोकमधून बांधला आहे.

महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी श्री. शरद पवार, तर संचालक म्हणून अजित पवार आहेत. असे त्रांगडे अनेक संस्थांत आहे. या संस्थांचा वेलू गगनावर नेण्याचे काम शरद पवार यांनी केले. त्या वेलूवर आज जे लटकत उभे आहेत त्यांनी त्यांची पदे सोडून स्वत:च्या नव्या संस्था निर्माण करण्याचे राजकीय औदार्य दाखवायला हवे. पण शेवटी हा पवारांच्या कुटुंबातला अंतर्गत प्रश्न आहे, असंही रोखठोकमधून म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT