Nashik Crime: केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील चैन हिसकावली; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik News: नाशिक शहरात गेला अनेक दिवसांपासून चोरी, खून, दरोड्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Bharati Pawar
Bharati Pawar Saam TV
Published On

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik News: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या मातोश्रींच्या गळ्यातली 2 ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्याने हिसकावल्याची घटना समोर आली आहे. घटना नाशिकच्या आरटीओ ऑफिस परिसरातील दुर्गा नगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Bharati Pawar
Shivaji Adhalrao Patil: 'निवडून आलं की मी निघालो शूटिंगला...'; खासदार कोल्हेंवर आढळरावपाटीलांचा हल्लाबोल

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्रीच्या गळ्यातली पोत सोडून चोरून नेल्याने नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शांताबाई बागुल असे भारती पवारांच्या आईचे नाव आहे. त्या सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी परिसरात असलेल्याच भाजी मार्केटमध्ये जात होत्या.

यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन इसमाने त्यांच्या गळ्यातली सोन्याची पोत हिसकावून नेली. यावेळी शांताबाई बागुल घाबरून गेल्या या परिसरामध्ये जास्त वर्दळ नसल्यामुळे त्यांना कोणाला आवाज देखील देता आला नाही असे त्यांनी सांगितले. ही घटना झाल्यानंतर खूप घाबरल्याचेही त्या म्हणाल्या.

Bharati Pawar
Cm Eknath Shinde News: स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान, नाशिक शहरात गेला अनेक दिवसांपासून चोरी,खून, दरोड्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शहरात नाशिक पोलीस आयुक्तांचा अंकुशच राहिला नसल्याचे प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना, भामट्यांना पोलीसांचा धाक दाखवावा अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जाते आहे... (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com