Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : रेकी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सरकारवर टीका करत म्हणाले, "झुंडशाही, गुंडगिरी आणि सुपारी..."

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घरातील रेकीचे प्रकरण समोर आले आहे. सकाळी दहाच्या सुमारास दहा मोबाईल कॅमेरे लावून दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी रेकी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घरातील रेकीचे प्रकरण समोर आले आहे. सकाळी दहाच्या सुमारास दहा मोबाईल कॅमेरे लावून दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी रेकी केली. घराच्या सीसीटीव्हीवरुन सदर प्रकार समोर आला. दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी घराचे फोटो काढल्याचेही राऊत कुटूंबीयांनी पोलिसांना सांगितले. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगेच तपास करायला सुरुवात केली. या प्रकरणावरुन विधिमंडळात गदारोळ होऊन विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

दरम्यान संजय राऊत यांनी या रेकी प्रकरणावर भाष्य केले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी "महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, झुंडशाही, गुंडगिरी आणि सुपारी हे सरकार पुरस्कृत सुरू आहे. राज्यात गुंडांना सुरक्षा व्यवस्था आहे. भारतीय जनता पक्षाचे किंवा शिंदे गटाचे, अजित पवार गटाचे असंख्य लोक आहेत, त्यांच्या मागे पुढे चार चार बंदूकधारी पोलीस आहेत हे त्यांचे मर्जी आहे. बाबा सिद्दिकींसारख्या नेत्याची हत्या झाली. बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली. परभणीमध्ये गैरप्रकार झाला. महाराष्ट्रातलं वातावरण अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत." असे म्हटले.

सुरक्षेच्या मुद्द्यावरुन त्यांनी सरकारवर टीकाही केली. टीका करताना ते म्हणाले, "नवीन सरकार जेव्हा आलं, तेव्हा सर्व राजकीय विरोधी नेत्याची सुरक्षा काढून घेण्यात आली. सरकार बदललं असलं तरीही सुरक्षा काढणे हा अत्यंत निर्गुण प्रकार आहे. राजकीय सूडाचा प्रकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचा निर्णय कधीही घेण्यात आला नव्हता. १९९१ पासून मी सामनाचा संपादक आहे. कायम हिटलिस्टवर असतो. मला शिवसेनेचा नेता, खासदार म्हणून सुरक्षा व्यवस्था असायची."

राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घणाणात केला. "आम्ही राजकारणामध्ये आपल्यावर टीका करतो, आपल्या विरोधात भूमिका मांडतो म्हणून आपण आम्हाला शत्रू समजता आणि शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता. सरकारमध्ये सामील झालेल्या काही फोर्सेस आहेत, ज्यांच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडत आहे. या फोर्सेसविरुद्ध आम्ही काम करत आहोत. आमच्या घरावरती पाळत ठेवली जात आहे. पण हे आमच्यासाठी काही नवीन नाही. आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे."

"याप्रकरणाबाबत पक्ष प्रमुखांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विधिमंडळातही विषय मांडला. भास्कर जाधव, अनिल परब या आमच्या प्रमुख नेत्यांनी हा विषय चर्चेत आणला. याविषयी आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्याना भेटायला गेले. तसेच उद्धव ठाकरे यांनीही फोन करुन विचारपूस केली." असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

Written By : Yash Shirke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

SCROLL FOR NEXT