Ladki Bahin Yojana: काम झाले, विषय संपला...; लाडकी बहीण योजनेवरून अभिनेता संतापला

Kiran Mane on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची सगळीकडे जोरदार चर्चा होत असताना महायुती सरकारच्या या योजनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेता किरण माने यांनी टीका केली आहे.
Ladki Bahin Yojana: काम झाले, विषय संपला...; लाडकी बहीण योजनेवरून अभिनेता संतापला
Ladki Bahin YojanaSaam Digital
Published On

विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला खूप चांगला फायदा झाल्या. या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतं दिली. या योजनेला राज्यभरातील महिलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दहमहा १५०० रुपये पैसे दिले जातात. सध्या या लाडकी बहीण योजनेची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. अशामध्ये महायुती सरकारच्या या योजनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेता किरण माने यांनी टीका केली आहे. किरण माने यांनी लाडक्या बहीण योजनेवर सवाल उपस्थित केला आहे.

किरण माने यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, 'बहिणींनी दरमहा दिलेला खाऊ आणि “पैसे आले का?” हे विचारणारा भाऊ, दोन्हीही गुंडाळून डस्टबीनमध्ये फेकून दिले आहेत! काम झाले, विषय संपला. लाडक्या तायांनो, आता रस्त्यारस्त्यावर समोर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून तुम्ही स्वत:च स्वत:चं रक्षण करा.’

किरण माने हे नेहमी आपल्या रोखठोक वक्तव्य आणि पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. सामाजिक विषय असो किंवा राजकीय कोणत्याही विषयावर ते आपले मत मांडताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अभिनयानंतर राजकारणात एन्ट्री केली. शिवसेना ठाकरे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला. तेव्हापासून ते वारंवार महायुती सरकारवर टीका करताना दिसतात. आता त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Ladki Bahin Yojana: काम झाले, विषय संपला...; लाडकी बहीण योजनेवरून अभिनेता संतापला
Ladki Bahin Yojana: लाडकीच्या अर्जांची छाननी होणार? बहिणींनो, तुमचे 1500 रुपये होणार बंद?

किरण मानेंची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरण माने यांच्या पोस्टवर नेटकरी देखील कमेंट करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘एकदम बरोबर दादा…’, दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘ते होणारच होतं फक्त निवडणूक होण्याची वाट बघत होते..’, तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘किरणजी परखड सत्य मांडलं आहे…’ किरण माने यांची ही रोखठोक शैली त्यांच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना प्रचंड आवडत आहे.

Ladki Bahin Yojana: काम झाले, विषय संपला...; लाडकी बहीण योजनेवरून अभिनेता संतापला
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात; तुम्हालाही आले का? लगेच मोबाईल करा चेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com