Sanjay Raut Saam Digital
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; नाशिकपाठोपाठ ठाण्यातही गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकपाठोपाठ आता ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाच वातावरण आहे.

दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले असून राऊत यांच्याविरोधात नाशिकपाठोपाठ ठाण्यामध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकचे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कलम 500 नुसार संजय राऊत यांच्या विरोधात बदनामी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत चाटूगिरी शब्द वापरल्याने त्यांची बदनामी झाल्याच तक्रारीत नमूद केले आहे. (Political News)

संजय राऊत काय म्हणाले होते?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले, असं विधान अमित शाह यांनी केलं होतं. शाह यांचं हे विधान ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलं आणि वाद सुरू झाला होता.

दरम्यान, शहा यांच्या विधानानंतर पलटवार करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगावमध्ये आज पुन्हा तापमानात वाढ

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

वा रं मास्तर! सहावीच्या विद्यार्थिनींना दिलं दहावीचे पेपर तपासण्याचं काम; Video Viral

SCROLL FOR NEXT