Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन; नेमकी काय चर्चा झाली?

आपण उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो आहे. मात्र काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
Pankaja Munde Phone call To Uddhav Thackeray
Pankaja Munde Phone call To Uddhav Thackeray Saam TV

Pankaja Munde Phone call To Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission)  शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. सुरूवातीला 40 आमदार आणि त्यानंतर आता पक्षचिन्हही गेल्याने उद्धव ठाकरे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Latest Marathi News)

Pankaja Munde Phone call To Uddhav Thackeray
Sanjay Raut News : खासदार संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल; अटकही होणार? काय आहे प्रकरण?

एकीकडे भाजपचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत असताना, दुसरीकडे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी एक मोठं विधान केलं आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो आहे. मात्र काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

सध्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. चिंचवडमधील भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बोलताना हे सूचक विधान केलं आहे. (Political News)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे  एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) या दोन्ही नेत्यांसमोर आत्ताचा काळ कसोटीचा आहे. एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिलाय असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर केलं आहे.

Pankaja Munde Phone call To Uddhav Thackeray
Nawazuddin Siddiqui वर पत्नीनंतर मोलकरणीने केले धक्कादायक आरोप! रडतानाचा व्हिडिओ व्हायरल

सत्तेत असल्याने आपल्या सोबत असलेल्यांना भविष्यात निवडून आणणं, ही मोठी संधी शिंदे यांच्याकडे आहे. तर दुसरीकडे नावं नसताना पुन्हा आपला पक्ष उभ करण्याचं मोठं आवाहन उद्धव ठाकरे यांच्या सामोर असल्याचं सांगत पुढे काय घडतं याचं आपल्याला कुतूहल असल्याचं मत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं आहे.

त्याचबरोबर आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो, मात्र काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही म्हणत पंकजा यांनी सत्ता संघर्षावर विस्तृत बोलण्यचं टाळलं आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे मोठे अडचणीत सापडले आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका करण्यात येत आहेत. अशातच, पंकजा मुंडे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली, असा गौप्यस्फोट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com