Sanjay Raut Latest News saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार; संजय राऊतांनी सविस्तर सांगितलं

Sanjay Raut On Loksabha Seat Sharing: हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांच्या मोठ्या नेत्यांसह उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत, असं राऊत म्हणाले.

Ruchika Jadhav

मयूर राणे

Mahavikas Aghadi Seat Sharing:

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला काय असणार यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी १४ जागांचा फॉर्म्यूला सुचवला आहे. तर ठाकरेंची शिवसेना २३ जागा लगढवण्यासाठी इच्छूक आहे. असे झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त १३ जागा येत आहेत. त्यामुळे जागावाटपाच्या तीढ्यावर थेट दिल्लीत तोडगा निघणार असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांच्या मोठ्या नेत्यांसह उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. आम्ही २३ जागांची मागणी करत आहोत. यावर चर्चा सुरु आहे. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही दिल्लीत बोलू, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

अशा कार्यक्रमाने प्रभू राम यांना त्रास होईल

पुढे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रण न दिल्यावर यावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही आमंत्रणाची वाट बघत बसलो नाही. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा आहे. २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टच्या परेडचा हा कार्यक्रम नाही. हा पक्ष कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या. त्यांच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकवू द्या. अशा कार्यक्रमाने प्रभू राम यांना त्रास होईल आणि ते पुन्हा वनवासात जातील असे कृत्य करू नका.

अदानी शरद पवार भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, याच्यात महाविकास आघाडीचा काय संबंध? अदानी हा काय कळीचा मुद्दा नाही. आम्ही धारावी प्रकल्पाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याला आमचा विरोध आहे. कोण कोणाला भेटतंय यावर महाविकास आघाडीचं भविष्य नाही. शरद पवार आणि अदानी यांचे फार जुने संबंध आहेत, असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

SCROLL FOR NEXT