(अभिजीत सोनवणे)
नाशिकमध्ये सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अन्य दोन जणांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केलीय. दोन लाखाची लाच घेताना सीबीआयने भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला अटक केली. नाशिक येथील रहिवासी असलेल्या EPFO अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Latest News)
ईपीएफओ (EPFO) अधिकार्यावर खासगी पीएफ (PF) सल्लागारासोबत अवाजवी रक्कम मागण्याचा आणि स्वीकारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या फर्मशी संबंधित पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पीएफ आयुक्ताने (PF Commissioner) २ लाख रुपयांची लाच घेतली होती. ईपीएफओ अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे खासगी पीएफ सल्लागाराला लाच देण्याचे सांगितले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर तक्राराने सीबीआयकडे तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे लाच मागितली होती. सीबीआयने सापळा रचून खासगी व्यक्ती आणि ईपीएफओच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. नाशिक येथे सात ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
१ कोटींची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक
नगरमधील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल १ कोटींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाल्हवरकर यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली होती. अमित गायकवाड (वय ३२ वर्ष , रा. नागापूर ) असे लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.