Maha Vikas Aghadi Lok Sabha Election Seat Sharing Formula
Maha Vikas Aghadi Lok Sabha Election Seat Sharing FormulaSaam Tv

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी 'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? वंचितने सांगितला संपूर्ण प्लान

Maharashtra Lok Sabha Election: काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांची समान विभागणी व्हावी. प्रत्येकी १२ जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा, असा आमचा फॉर्म्युला रेखा ठाकूर यांनी सांगितले.
Published on

>> हिरा ढाकणे

Maha Vikas Aghadi Lok Sabha Election Seat Sharing Formula:

मोदी सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. महाराष्ट्रात यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की,  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांची समान विभागणी व्हावी. प्रत्येकी १२ जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा, असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

लोकसभेमध्ये काँग्रेससहीत कोणत्याच पक्षाची स्वबळावर पंतप्रधान निवडून आणण्याची ताकद नाही. त्यामुळे जागा वाटपावरून रस्सीखेच करण्यात अर्थ नाही. विधानसभेत मुख्यमंत्री होण्याची ताकद या पक्षात आहे, त्यावेळी जागावाटपा साठी भांडू, पण आता ती वेळ नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maha Vikas Aghadi Lok Sabha Election Seat Sharing Formula
Mumbai News: अर्धा तास आधी बायकोशी व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं, पण एका मांजाने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त केलं

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीत नाहीत. दोन पक्ष फुटिमुळे कमकुवत आहेत. काँग्रेसचा मागच्यावेळी एकच खासदार होता. त्यामुळे हे तीनही पक्ष पर्याय होऊ शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Latest Marathi News)

मागच्या लोकसभा निवडणुकीतून अस दिसून आले आहे की, वंचित बहुजन आघाडीकडे मते आहेत. गेल्या पाच वर्षांत वंचित चा जनाधार वाढला असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या निवडणुकीत मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा आहे. कोणीही अती आत्मविश्वास बाळगू नये सध्या तशी परिस्थीती नाही, असा सल्ला ही त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना दिला आहे.

Maha Vikas Aghadi Lok Sabha Election Seat Sharing Formula
PM Modi YouTube Channel: यूट्यूबवरही PM मोदींचा डंका, सर्वाधिक सबस्क्रिप्शन मिळवणारे बनले पहिले राजकारणी

विरोधकांनी मोदींना सत्तेतून हरवले नाही तर जेल मध्ये जावे लागेल. सत्तेवर असताना छोट्या मोठ्या चुका होतात त्यामुळे जेल मध्ये टाकण्याची आवश्यकता नसते. मोदी शहा ज्या प्रमाणे वागत आहेत, ते योग्य नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

प्रत्येकी १२ जागांच्या फॉर्म्युला मध्ये आमची भूमिका अशी आहे की, आमच्या वाट्याला आलेल्या 12 जागांपैकी कमीत कमी ३ उमेदवार हे मुस्लीम राहतील. ज्या समुहासाठी वंचित बहुजन आघाडी राजकीय भूमिका घेत आहे. ते जे वंचित समूह ओबीसी, व्ही.जे.एनटी यांच्यासाठी देखील योग्य प्रतिनिधित्व आम्ही देऊ जे इतर प्रस्तापित पक्ष देत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com