Sanjay Raut Demands Immediate Action Against Bawankule Saam
महाराष्ट्र

'विरोधी पक्षातील नेते अन् पत्रकारांच्या फोनवर नजर''; ठाकरे गटाच्या खासदाराकडून बावनकुळेंच्या अटकेची मागणी

Sanjay Raut Demands Immediate Action Against Bawankule: खासदार संजय राऊतांनी बावनकुळे आणि त्यांच्या टीमवर अत्याधुनिक फोन टॅपिंग यंत्रणा वापरण्याचा गंभीर आरोप केला आहे.

Bhagyashree Kamble

  • संजय राऊतांचा बावनकुळेंवर गंभीर आरोप.

  • विरेधी पक्षातील नेत्यांच्या फोनवर नजर.

  • बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी.

भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच खळबळजनक दावा केला होता. भंडाऱ्यातील एका बैठकीत त्यांनी सांगितले की, 'जर एखाद्या कार्यकर्त्याने बेईमानी केली तर, सर्वांचे फोन सर्व्हिलन्सवर आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुणाशी काय बोलत आहात, या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत आहे', असं बावनकुळे म्हणाले होते. यामुळे हे स्पष्ट होते की, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झालेत. त्यांनी पत्रकार परिषदेत मोठी मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बावनकुळे यांच्या विधानावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. 'चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर इंडियन टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला पाहिजे. गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. तसेच चौकशीही झाली पाहिजे', अशी मागणी संजय राऊतांनी केली.

'हे फक्त भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपूरतं मर्यादित नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेत्यांचे फोन ऐकले जात आहे. त्यांचे व्हॉट्सअॅप पाहिले जात आहे', असा खळबळजनक आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

'चंद्रशेखर बावनकुळे, त्यांची टीम, रवींद्र चव्हाण, तसेच मुंबईतील काही नामांकित बिल्डर्स जे भाजप पक्षाच्यासोबत आहेत, नागपूरमधील काही यंत्रणा यांनी एकत्र मिळून एक वॉर रूम उघडले आहे. ही यंत्रणा पेगाससपेक्षाही अत्याधुनिक आहे', असं राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी मोठी मागणी केली आहे. 'फडणवीस यांनी बावनकुळे यांना बरखास्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांना अटक झाली पाहिजे', असं राऊत म्हणाले. 'मुंबई,पुणे, नागपूर या तीन ठिकाणी फोन टॅप करण्याचे मशीन्स लावले आहेत.  यामध्ये पत्रकारांचे सुद्धा फोन टॅप केले जात आहेत', असंही राऊत म्हणाले. 'देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रसुरक्षा कायद्यांतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा', अशी मागणी राऊतांनी केली.

अमित शहा यांचे देखील फोन टॅप होत असल्याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली. 'या यंत्रणा नेमक्या कुठून आल्या आहेत? कुणाच्या मदतीने त्या मशीन्स लावण्यात आल्या आहेत. याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे', असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला

सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा; मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT