'राणे अतिशहाणे'; संजय राऊतांचा वार  Saam Tv news
महाराष्ट्र

'राणे अतिशहाणे'; संजय राऊतांचा वार

आमच्या कुंडल्या काढण्याची धमकी देतात, काढा आमच्या कुंडल्या, तुम्हाला कुंडल्या नाहीत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत सोनावणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केंद्रसरकारच्या योजना देशातील नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी जन आशिर्वाद यात्रेचे (Janashirvad Yatra) आयोजन केले आहे, पण राणे हे पंतप्रधान मोंदीचाही आदेश ऐकत नाहीत, भाजपाचही ऐकत नाहीत, केवळ राज्यसरकारवर टिका करुन अतिशहाणपणा करत आहेत, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणेंवर (Narayan Rane) पलटवार केला आहे. मुंबईत आयोजित एका सभेत ते बोलत होते.

हे देखील पहा-

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''भाजपाने जेव्हा नारायण राणे यांना केंद्रिय मंत्रीपद दिले आहे, तेव्हापासून हा माणूस केवळ महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे यांच्यावर सातत्याने टिका करत आहेत. पण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आम्हाला टिका सहन करण्याची सवय आहे. पण मंत्र्यांची भाषा सभ्य असावी. पण केंद्रिय मंत्री झाल्यापासून राणे सातत्याने राज्यसरकारवर टिका करत आहेत. ज्या दिवसापासून हे महाशय मंत्री झालेत तेव्हापासून हा पक्ष १० फुट मागे जातोय, आता भाजपाला आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. असे म्हणत संजय राऊतांनी भाजपाला टोला लगावला आहे.

आम्हाला तुम्ही अजिबात धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमच्या बापाचे श्राद्ध घालू. आमच्या कुंडल्या काढण्याची धमकी देतात, काढा आमच्या कुंडल्या, तुम्हाला कुंडल्या नाहीत का? आम्ही पण तुमच्या संदूक काढू, तेव्हा पळता भुई थोडी होईल, असे म्हणत संजय राऊतांनी राणेंवर पलटवार केला आहे. संभाजीराजेंसोबत तुलना करतात किती हवा डोक्यात गेली, मुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे, त्याचा मान राखला गेला पाहिजे, पण जर मुख्यमंत्री पदाचा मान जर महाराष्ट्राचा माणूस राखणार नसेल तर तो मराठी माणूस नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

Edited By - Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT