Maharashtra Congress मध्ये नव्या जंबो कार्यकारिणीवर नाराजी

प्रदेशाध्यक्ष आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार
Congress नव्या कार्यकारिणीवर पक्षनेत्यांमध्ये नाराजी
Congress नव्या कार्यकारिणीवर पक्षनेत्यांमध्ये नाराजी
Published On

नवी दिल्ली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra Pradesh Congress Committee) 190 सदस्यीय जंबो राज्य कार्यकारिणीची गुरुवारी निवड करण्यात आली. मात्र या कार्यकारिणीवर काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) , राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) आणि स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी सुचवलेल्या काँग्रेस नेत्यांची नावे राज्य कार्यकारिणीत समाविष्ट नसल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभुमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या सचिवांनी पैसे घेऊन मोठ्या संख्येने लोकांना पदे विकली असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळेच राज्यातील प्रमुख नेत्यांनी सुचवलेल्या नेत्यांना जागा दिली गेली नसल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. तर आयसीसीच्या सचिवांनी 25-50 हजार रुपये घेऊन राज्य कार्यकारिणीची पदे विकली असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.

Congress नव्या कार्यकारिणीवर पक्षनेत्यांमध्ये नाराजी
Nashik: शिवसेना आणि भाजप कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप

राज्यातील सर्व बड्या नेत्यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जर त्यांच्या लोकांना संघटनेत स्थान मिळाले नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणी येऊ शकतात. वरिष्ठ नेत्यांची नाराजी आणि राज्य कार्यकारिणीची पदे विकल्याच्या आरोपांबद्दल कॉंग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना माहिती देण्यासाठी नाना पटोले शुक्रवारीच दिल्लीला पोहोचल्याचे वृत्त आहे.

Edited By - Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com