बलात्कारांनाही राजकीय पक्ष निर्माण झालेत  saam tv news
महाराष्ट्र

बलात्कारांनाही राजकीय पक्ष निर्माण झालेत

सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांकडून भाजपाचा रोखठोक समाचार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

''दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाल्यानंतर तिला मारून टाकले. राहुल गांधी (Rahul Gandhi meets ) त्या मुलीच्या कुटुंबियांना भेटायला गेले. तेव्हा भाजपने विचारले, ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ बलात्कारांना राजकीय पक्ष निर्माण झाले. हे प्रथमच घडत आहे.'' अशा शब्दांत दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपाचा रोखठोक समाचार घेतला आहे. तसेच राहूल गांधीची (Rahul Gandhi) पाठराखणही केली आहे. (Sanjay Raut criticized BJP over rape case in Delhi)

काय म्हटले आहे संजय राऊतांनी

- राहूल गांधीच्या पिडीत कुटुबांच्या भेटीनंतर भाजपा नेते संबित पात्रा यांनी त्यांच्यावर टिका केली होती. याच टिकेला उत्तर देताना राजधानी दिल्लीसारख्या शहरात अशी घटना घडते आणि केंद्रसरकार याची जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. याउलट राहूल गांधीनी पिडीत कुटुबांची भेट घेतली तर संबित पात्रा यांनी त्यांनाच कॉंग्रेसशासित राज्यात बलात्कार होत नाहीत का असा उलट प्रश्न विचारला. यामुळे भाजपाला नेत्यांना कोणत्याही विषयाचे गांभीर्य राहिले नसल्याची टिका संजय राऊतांनी केली आपल्या रोखठोक मधून केली आहे.

- राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचा राहुल गांधीच्या फोटोवर आक्षेप

राहूल गांधीनी पिडीतेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पिडीतेच्या आईचे सांत्वन करतानाचा फोटोवर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (National Commission for the Protection of Child Rights) आक्षेप घेतला आहे. तसेच हो फोटो ट्विटरवरुन काढण्याची मागणी केली आहे. यावरही संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

आपल्या राज्यात अशा प्रकारचे गुन्हे घडतात तेव्हा विरोधकांनी तेथे पोहोचू नये, अशी तेथील सरकारची इच्छा असते. पण विरोधी पक्षाचा एक प्रमुख नेता बलात्कारपीडितेच्या कुटुंबास भेटून आपल्या भावना व्यक्त करतो. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अन्याय पीडितेचा आक्रोश व्यक्त करायचा नाही, अशी लोकशाही व स्वातंत्र्याची नवीन व्याख्या कोणी बनवण्याचा प्रयत्न करत असले तर त्याने तसे स्पष्ट सांगावे. असेही त्यांनी म्हटले आहे.

- मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या फोटोला आक्षेप का नाही?

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने राहुल गांधीचे बलात्कारपीडितेच्या कुटुंबाला भेटल्याचे छायाचित्र ट्विटरवरून हटवण्याची मागणी केली आहे. मग बलात्कारपीडित निर्भयाच्या माता-पित्यांना तेव्हा नरेंद्र मोदीही भेटलेच होते. त्या फोटोला राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप का घेतला नाही, हे असे आणखी किती काळ चालणार? असाही परखड सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत! पण सध्या तसे झाले आहे. अशी खंत त्यांनी आपल्या रोखठोक मधून व्यक्त केली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT