Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : वक्फवरून संजय राऊत दिल्लीत तुटून पडले; महाराष्ट्रात भाजप आमदार कडाडले

Sanjay Raut Vs BJP : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकारणही तापलं आहे. राज्यसभेत सत्ताधारी भाजपवर तुटून पडलेल्या संजय राऊतांवर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी झोड उठवली आहे.

Nandkumar Joshi

सुशील थोरात, अहिल्यानगर

वक्फ दुरुस्ती विधेयक बहुमताने लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हल्ला-प्रतिहल्ला होत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरून सरकारवर हल्ला चढवला. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील भाजप नेत्यांनी संजय राऊतांवर प्रतिहल्ला केला.

'संजय राऊतांना वक्फविषयी इतका पुळका का?'

खासदार संजय राऊत यांना वक्फविषयी इतका पुळका का, असा सवाल भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देणं प्रत्येकाने टाळलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्याला कुठलाही आधार नसतो, असंही पाचपुते म्हणाले.

विधेयक नीट वाचले तर त्यात असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही. विधेयक संमत झाल्यानंतर वक्फ बोर्डाला कुठल्याही जागेवर हक्क सांगता येणार नाही. मला नवल वाटते की कधीकाळी हिंदू राष्ट्र आणि हिंदूंविषयी बोलणारे संजय राऊत यांना आज पुळका का आला? त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची आमची पात्रता नाही, असा टोलाही पाचपुते यांनी लगावला. संजय राऊत यांच्या बोलण्यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणे प्रत्येकाने टाळले पाहिजे, असंही भाजपचे आमदार पाचपुते म्हणाले.

दुसरीकडे, भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनीही संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. औरंगजेबाच्या थडग्यावर नमाज अदा करणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षा काय, असं चौधरी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्डाबाबत घेतलेला निर्णय देशहिताचा असून, क्रांतिकारी निर्णय आहे. ज्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकले, हिंदुत्व विकलं, महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली. जे आता औरंगजेबाच्या थडग्याजवळ जाऊन नमाज अदा करत आहेत. त्या लोकांकडून आम्ही काय अपेक्षा ठेवणार, असं ते म्हणाले.

नीलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यावरून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. वक्फ विधेयकावर मी बोलेल, परंतू, त्यांच्यावर मी बोलणार नाही. मी बोललं की त्यांच्या खूप जिव्हारी लागतं, असा टोमणा गोऱ्हे यांनी ठाकरेंचं नाव न घेता मारला. तसंच यावेळी गोऱ्हे यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाचं समर्थन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT