Sanjay Raut posts a controversial photo, alleging involvement of 4 ministers and 4 MPs in a honeytrap case. Demands CBI probe. Political turmoil brews in Maharashtra. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ४ मंत्री, शिवसेनेचे ४ खासदार हनी ट्रॅपमध्ये, गिरीश महाजनांचा फोटो टाकत संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Girish Mahajan photo linked to honeytrap scandal goes viral : संजय राऊतांनी हनी ट्रॅप प्रकरणात ४ मंत्री, ४ खासदारांचा दावा करत फोटोसह ट्विट केलं, सीबीआय चौकशीची मागणी, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा गौप्यस्फोट.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut demands CBI probe in Maharashtra honeytrap scandal : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 'हनी ट्रॅप'च्या मुद्द्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. हनी ट्रॅपवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हनी ट्र्रॅपबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना राऊतांनी मंत्री गिरिश महाजन यांचा फोटो पोस्ट केले. फडणवीस यांनी विधानसभेत 'हनी ट्रॅप'चा राज्यात कोणताही प्रकार नसल्याचे सांगितले. राऊतांनी एक फोटो पोस्ट करत याची चौकशी व्हावी, असे टीकास्त्र सोडले अन् मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचे म्हटलेय.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर मंत्री महाजन यांचा एक फोटो पोस्ट करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या चौकशीतून सत्य उजेडात येईल आणि कोण खरे, कोण खोटे हे स्पष्ट होईल, असे राऊतांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहेत. राज्यातील 'हनी ट्रॅप' रॅकेटमध्ये चार मंत्र्यांसह अनेक अधिकारी आणि खासदारांचा समावेश आहे. संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वातावरण तापले आहे. याशिवाय शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटात सामील झालेल्या काही तरुण खासदारांनाही 'हनी ट्रॅप'मुळे पक्ष सोडावा लागल्याचा दावा राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी केलेला हा दावा खरा ठरल्यास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो.

पाहा संजय राऊत यांनी नेमकं काय ट्वीट केलेय ?

खासदार संजय राऊतांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. हनी ट्रॅपवरून राज्यात आधीच वातावरण तापलं असताना राऊतांनी थेट फोटो पोस्ट करत आणखी वातावरण तापवलं आहे. सीबीआयद्वारे तपास करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय राऊतांनी चार मंत्री आणि चार खासदारांची नावेही घेतली आहे. संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या चार तरूण खासदारांचा यात समावेश असल्याचे म्हटले. राऊतांनी थेट नाव घेणं टाळळं पण सोशल मीडियावर श्रीकांत शिंदेंची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राऊतांच्या दाव्यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर मिळतेय, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

राज्यातील कथित हनीट्रॅप प्रकरणात ७२ हून अधिक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आयएएस, आयपीएस तसेच काही माजी आणि विद्यमान मंत्र्यांना अडकवल्याचा आरोप आहे. नाशिकपासून हे प्रकरण सुरू झाले, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संवेदनशील व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. एका महिलेने वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांचे संशयास्पद कृत्यांचे व्हिडिओ असल्याचे म्हटले. ठाणे क्राइम ब्रांचला तीन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची गोपनीय तपासणी सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत एक पेन ड्राइव्ह दाखवत, यात 72 आयएएस अधिकारी आणि माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT