2006 Mumbai 7/11 blast case full acquittal by Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने 11 जुलै 2006 रोजी झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी 5 जणांना फाशी आणि 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु ती सर्व रद्द करण्यात आली आहे. अभियोजन पक्षाला आरोपींविरुद्ध खटला सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले.
बॉम्बे हायकोर्टाने 2006 च्या 7/11 ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात 12 जणांना दोषी ठरवणारा विशेष न्यायालयाचा आदेश रद्द केला. विशेष न्यायालयाने दोषींना मृत्युदंड आणि जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्यानंतर जवळपास एक दशकानंतर, हायकोर्टाने सर्वांची निर्दोष मुक्ताता केली. न्यायालयाच्या मते, टॅक्सी चालकांना किंवा आत असलेल्या लोकांना स्फोटानंतर जवळपास 100 दिवसांनी आरोपींची आठवण ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. बॉम्ब, बंदुका, नकाशे इत्यादी पुराव्यांच्या पुनर्प्राप्तीबाबत, न्यायालयाने असे म्हटले की, ही पुनर्प्राप्ती या प्रकरणात महत्त्वाची नाही, कारण अभियोजन पक्ष स्फोटांमध्ये वापरलेल्या बॉम्बचा प्रकार ओळखण्यात अपयशी ठरला.
विशेष खंडपीठ न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांदक यांनी सांगितले की, अभियोजन पक्षाला या आरोपींविरुद्ध पुरावे सादर करण्यात पूर्णपणे अपयश आले. बचाव पक्षाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, महाराष्ट्र ATS ने आरोपींकडून जबरदस्तीने आणि छळ करून जबाब मिळवले. तसेच, आरोपींना १८ वर्षे कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांचे आयुष्याचे महत्त्वाचे वर्षे नाहक गेल्याचा दावा केला गेला.
११ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये सात ठिकाणी स्फोट झाले. हे स्फोट माटुंगा, खार, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली, मीरा रोड आणि भाईंदर येथे संध्याकाळी 6:24 ते 6:35 दरम्यान झाले. या हल्ल्यात 209 जणांचा मृत्यू झाला, तर 700 हून अधिक जण जखमी झाले. रिमोट कंट्रोलद्वारे प्रेशर कुकरमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा वापर झाला होता. या प्रकरणात 11 आरोपींना शिक्षा झाली होती, परंतु 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली, कारण अभियोजन पक्षाला पुरावे सिद्ध करण्यात अपयश आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.