शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील संतापले
भाजपवर जहरी टीका
हिडीस आणि किळसवाणी राजकारण केल्याचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष आणि नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकांवर केंद्रीत आहे. अशातच सांगोल्यातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर जोरदार आणि विखारी टीका केली आहे. 'भाजपची सध्याची राजकीय शैली हिडीस आणि किळसवाणी आहे', अशी घणाघाती प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. यामुळे माजी आमदार शहाजी बापू पाटील संतप्त झाले आहेत. शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं की, 'भाजपचे सध्या सुरू असलेले राजकारण हे हिडीस, किळसवाणे, दहशतवादी आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्याप्रमाणे आहे. अशा प्रकारचे राजकारण सुरू राहिले तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल', अशी विखारी टीका शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर केली.
यावेळी शहाजी बापू पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'एका बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे काम बाहेरच्या लोकांनी केलंय', असा थेट आरोप शहाजी बापू पाटील यांनी गोरे यांचं नाव न घेता केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अकलूज आणि बार्शी वगळता इतर ठिकाणी भाजपच्या दबावतंत्रामुळे भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी अशी युती होऊ शकली नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 'भाजपचे राजकारण दहशतवादी स्वरूपाचे असून हिडीस आणि किळसवाणे' असल्याची विखारी टीका करत शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यातील राजकीय वातावरण तापवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.