Sangola Panchayat Samiti Standoff saam tv
महाराष्ट्र

शिवसेना नेत्याची दादागिरी, अधिकाऱ्यांना थेट कार्यालयाबाहेर काढलं, 2 तास कामकाज ठप्प

Sangola News: सांगोला पंचायत समितीत शिवसेना उपसभापती अजय सरगर आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढल्याने दोन तास कामकाज ठप्प झाले.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: सांगोला पंचायत समितीमध्ये आज सकाळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दादागिरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. अधिकारी-कर्मचारी विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढत पंचायत समितीचे कामकाज बंद पाडले. तब्बल दोन तासांपासून कार्यालयीन कामकाज ठप्प असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला पंचायत समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात तणावाचे वातावरण होते. विकासकामांच्या फाईल्स, ग्रामपंचायतींना निधी वाटप आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीत अधिकारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप उपसभापती अजय सरगर यांचा आहे.

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उपसभापती अजय सरगर हे आपल्या कार्यकर्त्यांसह पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. त्यांनी थेट गटविकास अधिकारी आणि इतर शाखांच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. वाद विकोपाला गेल्यानंतर सरगर यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढले आणि दारे बंद करून घेतली.

ऐन गर्दीच्या वेळी हे कामकाज बंद झाल्याने सांगोला तालुक्यातील विविध गावांमधून दाखले, घरकुल, रोजगार हमी योजना आणि इतर कामांसाठी आलेल्या शेकडो नागरिकांना ताटकळत बसावे लागले. दोन तासांपासून एकही फाईल हलत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्रास डीजे आणि डॉल्बीचा ध्वनी प्रदूषण

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्ण बाजारात आज अचानक भाव कोसळले; पाहा नवीन दर

भिजवलेले बदाम की मनुके, वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर?

Gen Z तरुण थेट रविंद्र चव्हाणांसमोर पोहोचले आणि... कल्याण-डोंबिवलीत अचानक काय घडलं?

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT