sangli zilla parishad slab collapsed
sangli zilla parishad slab collapsed saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad News : साहेब... दाेन वेळा स्लॅब काेसळलाय, एखाद्याचा जीव जाईल हाे ! झेडपी कर्मचा-यांची इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

विजय पाटील

Sangli Zilla Parishad News : सांगली जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील महिला व बाल कल्याण विभागातील स्लॅबचा भाग अचानक कोसळला. या घटनेनंतर काेणालाही दुखापत झालेले नाही. दरम्यान एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक भाग उतरवून घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्हा परिषदेतील दुसरा आणि तिसरा मजला धोकादायक बनला आहे. चार दिवसांपूर्वी दुसऱ्या मजल्यावरील मुख्य सभागृहकडे जाणाऱ्या पोर्चचा काही भाग कोसळला होता.

शुक्रवारी (ता.11) तिसऱ्या मजल्यावरील महिला व बाल कल्याण विभागातील स्लॅबचा भाग कोसळला. याप्रसंगी या विभागातील एक महिला कर्मचारी प्रसंगावधान राखत बाजूला सरकल्याने मोठी दुर्घटना टळली.

सद्यस्थितीत महिला व बाल कल्याण विभागाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कार्यालयीन काम हे लगतच्या पॅसेजमधून सुरू आहे. शुक्रवारी दुपारी या पॅसिज मधील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला.

या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत उपमुख्यकार्यकरी अधिकारी संदीप यादव व इतर कर्मचाऱ्यांनी सीईओ तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

दरम्यान सद्यस्थितीत येथील कर्मचाही हे स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे एखाद्याचा बळी जाण्याअगोदर जिल्हा परिषदेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक भाग उतरवून घ्यावा अशी मागणी होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

Maharashtra Lok Sabha Voting Live: निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके

Lok Sabha Election Voting | बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी बजावला मतादानाचा हक्क!

Shiv Sena UBT vs BJP: मतदान केंद्रावरच ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना भिडले!

SCROLL FOR NEXT