Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime: डोक्यावर कर्जाचा डोंगर, उसनवारीच्या पैशांचा तगादा, बायको अन् पोटच्या लेकानं केली बापाची हत्या; सांगली हादरलं

Woman kills husband for insurance money: पाटील यांच्यावर कर्जाचं ओझं होतं. कर्ज फेडण्यासाठी एका महिलेनं आपल्या पतीची हत्या केली आहे. पतीची हत्या करण्यासाठी तिनं मुलगा आणि मित्राचीही मदत घेतली.

Bhagyashree Kamble

पतीचे विम्याचे पैसे मिळावेत म्हणून एका पत्नीनं मुलाच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये घडली आहे. पतीची हत्या केल्यानंतर हत्येचा बनाव रचला. या घटनेचा तपास केला असता पत्नीनं पतीची हत्या केली असल्याचं समोर आलं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. पाटील यांच्यावर कर्जाचं ओझं होतं. कर्ज फेडण्यासाठी एका महिलेनं आपल्या पतीची हत्या केली आहे. कारण पतीच्या विम्याच्या पैशांवर पत्नीचा डोळा होता. हेच पैसे घेऊन पत्नीला कर्ज फेडायचे होते. यासाठी तिनं मुलगा आणि मित्राला मदतीला घेऊन पतीची निर्घृण हत्या केली.

बाबूराव दत्तात्रय पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी वनिता बाबूराव पाटील, मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि महिलेचा मित्र भिमराव गणपतराव हुलवान अशी आरोपींची नावे आहेत.

महिलेनं आधी पतीच्या हत्येचा कट रचला. नंतर याची माहिती मुलाला आणि मित्राला दिली. प्लान प्रमाणे त्यांनी पतीची हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर हत्येचा बनाव रचला. पण पोलीस तपासात पत्नी, तिचा मुलगा आणि मित्राने हत्या केली असल्याचं उघडकीय झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT