Sangli Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Sangli News : म्हैसाळ कालव्यात पोहण्यासाठी उतरले; बाहेर आलेच नाही, दोन जिवलग मित्रांचा दुर्देवी अंत

Miraj Taluka News : मिरज तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात तीन तरुण बुडाले. ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे यातील एका तरुणाला वाचविण्यात यश आले.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात तीन तरुण बुडाले. ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे यातील एका तरुणाला वाचविण्यात यश आले. मात्र, इतर दोन तरुण वाहून गेले. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सलमान शौकत तांबोळी (वय २१ वर्ष) आणि आरमान हुसेन मुलाणी (वय १६ वर्ष) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. तर नदीम फिरोज मुलाणी (वय १८) असं वाचविण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हे तीनही तरुण माधवनगर येथील रहिवासी असल्याचं कळतंय. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधीत तिघे तरुण वाहनचालक आहेत. मंगळवारी दुपारी एक भाडे घेऊन ते बेडग (Sangali News) परिसरात आले होते. भाडे सोडून झाल्यानंतर सदर तिघेजण बेडग येथे आले. यावेळी म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्यात पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही.

दरम्यान, तिघेही तरुण पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तिघेही अचानक वाहू लागले. तरुण पाण्यात बुडल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी कालव्याच्या दिशेने धाव घेतली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे यातील नदीम मुलाणी नामक तरुणाला वाचविण्यात यश आले.

मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने इतर दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना अपयश आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आता या बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Bus Crash: प्रवासी बस २०० मीटर दरीत कोसळली, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी; पेरूमध्ये भयंकर अपघात

Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ४ सुपुत्रांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती; प्रेरणादायी प्रवास वाचा

Beed Politics : बीडमध्ये मुंडे भावाबहिणीची युती, परळी नगरपरिषद राखण्यात यश मिळणार का? VIDEO

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

SCROLL FOR NEXT