Sangali News Saam Tv
महाराष्ट्र

Black Magic : सांगलीत काळी जादू! स्मशानभूमीत फोटो, बाहुल्या आणि लिंबू-मिरचीने केलेली पूजा बघून गावकरी हादरले

Sangali News : सांगली जिल्ह्यातील गावात स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार उघड झाल्याने गावकरी हादरले आहेत. काळी बाहुली, लिंबू-मिरच्या आणि फोटोसह केलेल्या पूजेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Alisha Khedekar

सांगली जिल्ह्यातील वासुंबे गावात स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार उघड झाला

काळी बाहुली, लिंबू-मिरच्या आणि फोटोसह पूजेची मांडणी पाहून गावकरी हादरले

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून तपास सुरू आहे

घटनेमुळे वासुंबे आणि तासगाव तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

सांगलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावात असलेल्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा अनोखा प्रकार केलेला पाहायला मिळाला. ही घटना काल संध्याकाळी नागरिकांच्या लक्षात आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

जग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे गेलेलं असतानाही आजही अनेक लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळतात. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वासुंबे गावातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. गावाजवळच्या स्मशानभूमीत एक रहस्यमय आणि भयावह दृश्य नागरिकांना पाहायला मिळाले.

काल संध्याकाळी गावातील स्मशानभूमीजवळ चार आयडेंटी साइजचे अज्ञात व्यक्तींचे फोटो, लिंबू-मिरच्या, काळी बाहुली, कवाळ आणि गुलाल लावलेली पूजेची मांडणी स्मशानभूमीत दिसून आली. गावकऱ्यांनी हे दृश्य पाहताच क्षणी त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. मात्र हे फोटो कोणत्या व्यक्तींचे आहेत हे अद्यापही समोर आलेलं नाही.

गावकऱ्यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून अशा प्रकारे अघोरी पूजा करणं चिंतेची बाब मानली जात आहे. या अघोरी पूजेचा नेमका हेतू काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. गावकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. या प्रकाराने वासुंबे गावात आणि तासगाव तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तासगाव पोलीस अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला धडक, कल्याणमधील दोघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप मनोमिलन

Sydney Mass Shooting: हातात बंदुक, कंबरेला काडतुसांचा पट्टा; बॉन्डी बीचवर गोळीबार करणाऱ्या एका हल्लेखोराचा फोटो आला समोर

Monday Horoscope: जोडीदारासोबत संबंध सुधारतील, ४ राशींना कामामध्ये यश मिळण्याची शक्यता; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Lionel Messi: जगप्रसिद्ध फुटबॉलपूट लिओनेल मेस्सीची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT