shirala  
महाराष्ट्र

ठाकरे सरकार! आता आमच्या मरणाची वाट पाहू नका? जागे व्हा!

विजय पाटील

सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम भागात निसर्गाने वरदान दिले आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र यावर्षी ना भूतो असा पाऊस झाल्याने डोंगरच आणि वाडी वस्तीच जीवन धोक्यात आले आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आणि काेयना धरणातील माेठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याचा विसर्गामुळे जिल्ह्यास पुन्हा एकदा महापूराचा सामना करावा लागला. त्यात शिराळा तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे शिराळा shirala तालुक्यात प्रचंड असे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सहा गावांवर डोंगराच्या भूस्खलनाची landslide टांगती तलवार आजही आहे. या भाागत जमिनीला आणि डोंगराला भेगा पडल्या आहेत. एखादी दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे. प्रशासनाने आणि सत्ताधा-यांनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्ह्यात महापूर आला. त्यात जास्तीत जास्त 585 मिलिमीटर पाऊस शिराळा तालुक्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक डोंगरांना याचा फटका बसला आहे. डोंगरावरील जमीन भुसभुशीत झाल्याने भेगा पडू लागल्या आहेत.

या महापुराने अनेक नद्यांनी पात्र बदलले आहे. जमिनी खचल्या आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगरावर आणि जमिनीत भेगा पडू लागल्या आहेत. निसर्गाचा समतोल होत नसल्याने डोंगराची पकड कमी होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी डोंगर पडले आहेत आणि जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत.

जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तेथील नुकसानीचा आढावा घेतला.परंतु सर्वाधिक फटका बसलेल्या शिराळा तालुक्यात मंत्र्यांनी पाठ फिरवली या शल्य तालुकावासियांना आहे. या परिसरात नागरिकांची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. येथे तातडीची मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.

माळीण किंवा तळीयेची घटना पाहता शिराळा तालुक्यात प्रशासन लक्ष कधी देणार याची वाट येथील शेतकरी आणि ग्रामस्थ बघत आहेत. शासन या वाड्या वस्तीला आधार कधी देणार याची आस लावून बसलेले आहेत. निसर्गाने घाला घालण्यापुर्वी शासनाने जागे व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे.

कोकनेवाडीकरांची व्यथा

शिराळा तालुक्यातील कोकनेवाडी ही वाडीवस्ती डोंगराच्या मध्यभागी आहे. पडणार पाऊस हा डोंगर माथ्यातून या वस्ती पाणी येते. शिवाय सततच्या पावसामुळे येथील घरामध्ये पाणी पाझरू लागले आहे. काही ठिकाणी घरांनी ओलावा देखील धरला आहे. घरात पाणी पाझरू लागल्याने येथील 200 लोकांचे स्थलांतर प्रशासनाने केले आहे. याठिकाणी घरात फक्त जनावरे ठेवण्यात आली आहेत. रोज सकाळी येथील ग्रामस्थ वाडीवर येतात आणि जनावरे आणि शेतात काम करून परत स्थलांतर केले आहे त्याठिकाणी जातात. प्रशासनाने त्यांना वाहनांची सोय करून दिली आहे.

घरात पाण्याचा पाझर येऊ लागल्याने ग्रामस्थांनी पाणी बाहेर काढण्यासाठी प्रत्येक घरात चर मारली आहे असे कोकनेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितले. ते म्हणाले काेकनेवाडी वस्तीवर एरवी माणसाची वरदळ असायची पण पुर्ण वस्ती स्थलांतर केल्याने घरांना कुलूप दिसू लागले आहेत. वस्ती सुनीसुनी झाली आहे. आमच्याकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे असेही ग्रामस्थांनी नमूद केले.

सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम भागात निसर्गाने वरदान दिले आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र यावर्षी ना भूतो असा पाऊस झाल्याने डोंगरच आणि वाडी वस्तीच जीवन धोक्यात आले आहे असे येथील ज्येष्ठ नागरिकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT