Vishal Patil  saam Tv
महाराष्ट्र

Sangli News: 'रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असं काम', भाजप नेत्याची खासदार विशाल पाटलांवर जहरी टीका

Sangli Politics News: रोहित पाटील विरुद्ध संजयकाका पाटील असा वाद रंगला असतानाच आता काँग्रेस खासदार विशाल पाटील यांच्यावरही संजयकाका पाटील यांनी जहरी टीका केली आहे.

विजय पाटील

Sanjay Kaka Patil On Vishal Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपनगराध्यक्षाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुनच सांगलीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे या मारहाण प्रकरणावरुन रोहित पाटील विरुद्ध संजयकाका पाटील असा वाद रंगला असतानाच आता काँग्रेस खासदार विशाल पाटील यांच्यावरही संजयकाका पाटील यांनी जहरी टीका केली आहे.

काय म्हणाले संजयकाका पाटील?

'रंग बदलणाऱ्या सरड्याला देखील लाज वाटेल,असा विशाल सरडा काम करतोय,' अशा शब्दात संजयकाका पाटलांनी खासदार विशाल पाटलांवर जहरी टीका केली आहे. जिल्ह्यातल्या मतदारसंघात भांडण लावण्याचे काम आणि दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन बेताल भाषण विशाल पाटील यांच्याकडून करण्यात येत आहेत. मात्र यापुढे विशाल पाटलांनी आपल्या बाबत बेताल वक्तव्य करणे थांबवली नाहीत तर त्याचे राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागतील,असा इशारा देखील संजयकाका पाटील यांनी दिला आहे.

कवठेमहांकाळ इथल्या माजी उपनगराध्यक्ष मारहाण प्रकरणी खासदार विशाल पाटलांकडून संजयकाका पाटील हे लोकसभेला पराभुत झाल्याने वैफल्यग्रस्त झाले असून आता विधानसभेनंतर संजयकाका नगरपंचायतला उभे राहतील की काय,अशी परस्थिती झाल्याची टीका विशाल पाटील यांनी केली होती, यावरुन संजयकाका पाटील यांनी हा इशारा दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांच्यावरही माजी खासदार संजयकाका पाटील यांनी टीका केली आहे.मतदारसंघांमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी कवठेमहांकाळ मारहाण प्रकरणात रोहित पाटलांकडून घाणेरड्या पद्धतीचे राजकारण करण्यात आलं पण जनतेला खुळ करण्याचा धंदा त्यांनी बंद करावा,असा इशारा देखील संजयकाका पाटलांनी रोहित पाटलांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT