सांगली: राजकीय वादातून चक्क धाबाच पेटवला ! 11 लाखांचे नुकसान... विजय पाटील
महाराष्ट्र

सांगली: राजकीय वादातून चक्क ढाबाच पेटवला ! 11 लाखांचे नुकसान...

जत पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

विजय पाटील

सांगली: जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी  येथील श्रीधर कोळी यांचा नव्याने बांधण्यात आलेला ढाबा सोसायटी निवडणुकीत झालेल्या वादाच्या कारणातून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. सोमवारी ता. 7 मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोळी यांचे 11 लाखांचे नूकसान झाले असून याबाबत जत पोलिस ठाण्यात श्रीधर कोळी यांनी सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे. (Sangli News Updates)

यामध्ये पोलिसांनी महांतेश नारायण मलमे, नारायण मलमे, दर्याप्पा मलमे, प्रकाश मलमे, प्रविणकुमार मलगोंडा पाटील, श्रीनिवास मलगोंडा पाटील, अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा-

मुचंडी सोसायटीची शनिवारी निवडणूक झाली आहे. काँग्रेस गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सायंकाळी कोळी हे बस स्थानक जवळ उभारलेले असताना वरील संशयित आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय, रात्री 8 वाजता घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कोळी यांच्या मालकीचा ढाबा पेटवून दिला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT