Sharad Pawar : सरकार अस्थिर करण्यात अपयशी, म्हणून हे प्रयत्न, फडणवीसांच्या आरोपांवर पवारांचं उत्तर

सत्ता हातातून गेल्यावर केंद्रीय यंत्रणा हातात घेऊन शासन अस्थिर करायचे प्रयत्न सुरु आहेत.
sharad pawar
sharad pawar Saam Tv

रश्मी पुराणिक -

मुंबई: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेत. विरोधकांना संपवण्याचा कट रचला जात असल्याचं त्यांनी काल विधानसभेत केलं. इतकंच नाही तर त्यांनी याचे पुरावे सादर करत अध्यक्ष्यांना पेन ड्राईव्हही दिला. त्यावर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. सरकार पाडण्यात यश येत नसल्याने ही टोकाची भूमिका घेतल्याचं शरद पवार म्हणाले (Sharad Pawar Reaction On Devendra Fadnavis Allegations).

sharad pawar
Breaking : फडणवीसांच्या आरोपानंतर गृहमंत्र्यांनी घेतली पवारांची भेट (पहा Video)

"फडणवीस यांच्या भाषणाचा काही भाग समजला. माझ्या मते गेले वर्ष दोन वर्ष महाराष्ट्र सत्ता हातातून गेल्यावर केंद्रीय यंत्रणा हातात घेऊन शासन अस्थिर करायचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात यश येत नाही त्यामुळे ही टोकाची भूमिका घेतली असावी", अशी प्रतिक्रिया शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलीये.

"मी आरोपांच्या खोलात गेलो नाही. पण मला काही गोष्टींचं कौतुक वाटलं. एक शासकीय वकिलाच्या कार्यालयात जाऊन किंवा त्याच्या सबंधित दाखवून 125 तास रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले हे कौतुकास्पद आहे. १२५ तास रेकॉर्डिंग करायचं म्हणजे ही प्रक्रिया किती दिवस चालली असेल. 125 तास रेकॉर्डिंग करायचं काम खरं असेल, तर त्यासाठी तशा शक्तीशाली एजन्सींचा वापर केला असं दिसतं आणि अशा एजन्सी फक्त भारत सरकारकडे आहे. त्यामुळे राज्यात राज्य सरकारच्या कार्यालयात तासंतास रेकॉर्डिंग करण्यात यशस्वी झाले. हे खर आहे का नाही हे सिद्ध झालं पाहिजे. राज्य सरकार चौकशी करेल सत्यता असत्यता पाहून घेतील".

"यात माझं नाव घेतल्याचे दिसते, माझं यासंबंधी कोणाशी बोलणं व्हायचं कारण नाही. इतक्या वर्षात माझ्याकडे गंभीर तक्रार आल्यावर, ती फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबात असल्याबाबत मी स्वत: ती माहिती फडणवीसांना कळवली. त्यांना म्हटलं सत्यता तपासून घ्या. एखादी व्यक्तीची सार्वजनिकरित्या तक्रार आल्यावर पाहून घ्या. त्यांच्याकडून मला कळवलं, की आम्ही बघतो. व्यक्तिशः माझा सबंध यायचं कारण नाही. आमची तक्रार ही आहे की, कोणीतरी तक्रार करायची त्यातून लोकप्रतिनिधी एजन्सींची मदत घेऊन नाउमेद करायचा प्रयत्न होतो आहे", असा आरोप पवारांनी केला.

"विशेषत: महाराष्ट्र बंगाल या राज्यात याची संख्या अधिक आहे. उदाहरणार्थ, अनिल देशमुख तक्रार पोलीस अधिकाऱ्याने केली. अनिल देशमुख तुरुंगा. ज्यांनी तक्रार केली त्यांचीही चौकशी सुरुये. अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्यानंतर चौकशी किती वेळ केली, कशा पद्धतीने केली जाते आणि सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचं मूर्तीमंत उदाहरण अनिल देशमुख आहे. माझ्याकडे माहिती आहे. अनिल देशमुख यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, सचिव, सीए अशा जवळपास ९५ लोकांकडे धाड झाली आणि जवळपास 200 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला. धाडीमध्ये, ईडीने ५०, सीबीआयने २०, आयकर विभागाने २० असे एकूण ९० छापे एका व्यक्तीवर टाकले गेले", असं पवार अनिल देशमुख प्रकरणावर म्हणाले.

"काल बोलले राज्य सरकार खोलात जाईल. जे मटेरियल दिले ते समजून घेतील. एकंदरीत स्थिती समोर ठेवतील, असा मला विश्वास आहे. एकीकडे हे होते, हे आरोप करताना इतरांकडे छापे टाकले जातात. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणे. शासन अस्थिर करण्याय यश येत नाही, म्हणून हे मार्ग अवलंबले जात आहे. हे संसदीय लोकशाहीला अशोभनीय आहे".

"माझ्या वाचनात आले, संजय राऊत यांनी यासंबंधीची माहिती पंतप्रधानांना दिलीये. अपेक्षा करुयात ते चौकशी करतील आणि या गोष्टींच्या खोलात जातील".

या पद्धतीनं कोणी संपत नाही - शरद पवार

"राजकारण कोणी कोणाला संपवतं, या पद्धतीनं कोणी संपत नाही. राजकीय मतभेद, स्पर्धा असतात. त्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात नाही. केंद्राची सत्ता आज फडणवीस यांच्या विचारांचा लोकांच्या हातात आहे. मोठे साहेब माझा उल्लेख असेल, तर माझ्या कुटुंबावर रेड पडली. त्यांना जे करायचं ते करावं".

मलिकांचा राजीनामा घेणार नाही - पवार

"नवाब मलिक केस किती वर्षापूर्वीची आहे. त्यावेळी नैतिक अधिकार किती आहे? जे काही शासकीय वकिलाच्या कार्यालयात माहिती हे खरं असेल. १२५ तास त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करायची क्षमता कुणाकडे असेल कोण करेल. यात सत्यता किती हे पहिले पाहिजे. हे सहज शक्य आहे वाटत नाही. रश्मी शुक्ला त्यांचे टेलिफोन नंबर नाव दुसऱ्याचे ही तक्रार आहे. हे गंभीर आहे.या यंत्रणांचा वापर कसा केला, हे स्पष्ट होते. या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही. सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. सरकार अस्थिर करायचे प्रयत्न सुरु आहेत. पण, प्रयत्नांना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पाठिंबा मिळणार नाही. एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. हे सतत सुरु आहे. मला फोन करून सांगितलं अन्य राज्यात सुरुये, याला तोंड देऊ. मलिकांचा राजीनामा का घेणार, काहीच सबंध नाही. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊद बरोबर जोडायचे हे घृणास्पद आहे", असंही शरद पवार म्हणाले

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com