

डेडलाईन, टार्गेट आणि अटेंडन्सच्या धास्तीमुळे आजारी असतानाही लोकांना नाइलाजानं कामावर जावंच लागतं... मात्र, विचार करा, जर तुमच्या बॉसनेच तुम्हाला असं सांगितलं की, आज कामावर येण्याची अजिबात इच्छा नसेल तर मग घरीच राहा... तुमचा विश्वास बसत नाहीये का... होय... हे खरं आहे... चीनमधील एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी थेट 'UNHAPPY LEAVE'ची घोषणा केलीये. चीनमधील कंपनीच्या 'UNHAPPY LEAVE' पॉलिसीमध्ये नेमक्या काय तरतूदी आहेत? ते पाहूयात
मूड खराब असेल, कामात मन नसेल तर ऑफिसमधून सुट्टी मिळणार
कर्मचाऱ्यांना वर्षाला 10 दिवसांच्या पेड लिव्ह मिळणार
कंपनीला रजा नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही
चिनी कंपनी पँग डोंग लाईची अनोखी लिव्ह पॉलिसी
मानसिक स्वास्थ्य आणि कार्यसंस्कृती सुधारण्यावर विशेष भर
चीनमधल्या या पॉलिसीची आता भारतातही जोरदार चर्चा सुरू झालीये. देशातील बडे उद्योगपती हर्ष गोयंका य़ांनी या चीनी पॉलिसीवर एक्स पोस्टही केलीये. भारतीय संदर्भात 'UNHAPPY LEAVE'ची गरज आहे का, यावर आपल्याला अधिक व्यापक चर्चा करण्याची गरज आहे. किंवा कामाच्या ताणामुळे येणारा थकवा टाळण्यासाठी आणि अशी कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी, जिथे लोकांना खरोखरच कामावर यावेसे वाटेल, यापेक्षा काही चांगला मार्ग आहे का?. भारतात कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरून नेहमीच विविध स्तरांवर चर्चा होत असते. त्यामुळे आता भारतातही 'UNHAPPY LEAVE'चं धोरण सुरू होणार का? याबाबत उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.