Sangli Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime: दिवाळीत सांगली हादरली! घरासमोर फटाके फोडल्यामुळे राडा, सख्ख्या भावांनी तरुणाचा काढला काटा

Youth killed by 2 brothers in sangli: सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी येथे घरासमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून दीपक सुवासे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली.

Priya More

सांगलीमध्ये दिवाळी सणाला गालबोट लागले आहे. फटाक्यांनी तरुणाचा जीव गेलाय. सांगलीच्या तासगावमध्ये घरासमोर फटाके फोडल्याच्या रागातून सख्ख्या भावांनी तरुणाची हत्या केली. येळावी गावामध्ये ही घटना घडली आहे. दीपक सुवासे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी येथे घरासमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून दीपक सुवासे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. सख्ख्या भावांनी धारधार शस्त्राने वार करून दीपकची हत्या केली. या प्रकरणी दोन्ही भावांना तासगाव पोलिसांनी अटक केली. विश्वजीत मोहिते आणि इंद्रजीत मोहिते या अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. मृत दीपक सुवासे आणि आरोपी शेजारी शेजारी राहतात. सुवासे आणि मोहिते या दोन्ही कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून जमीन आणि इतर कारणातून वाद होते. पुन्हा फटाक्यांचे निमित्त होऊन त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर विश्वजीत आणि इंद्रजीतने दीपकची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

तर दुसरीकडे पिपंरी चिंचवड शहरातील काळभोरनगर येथे किरकोळ वादातून एकाची हत्या झाली. किरकोळ वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगारावर लोखंडाने वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली. हत्येची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. २ नोव्हेंबरला रात्री दीड वाजताच्या सुमारास काळभोरनगर येथील व्ही. के. व्ही आटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

दिपू कुमार (१९ वर्षे) या तरुणाची लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आली. दीपू कुमारचा मित्र मुकेश हिरा कुशवाहने लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. कंपनीत जेवण बनवण्याच्या वादातून मुकेश कुशवाहाने दिपू कुमारची हत्या केली. या घटनेमुळे काळभोरनगर परिसरामध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणी पिपंरी पोलिसांनी मुकेश हीरा कुशवाह या आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

PM Kisan Yojana: दसरा की दिवाळी? शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार? PM किसानच्या हप्त्यावर अपडेट समोर

मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

SCROLL FOR NEXT