सांगली : सांगली आणि तासगाव कवठेमंकाळ या दोन मतदार संघात एकापेक्षा जास्त एकसारखे नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. एकाच नावाने उमेदवार असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मात देण्यासाठी ही शक्कल लढवल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. मात्र काही मतदारसंघात डमी उमेदवार उभा केला जात असतो. तर मतदान करताना गोंधळ निर्माण होण्याच्या अनुषंगाने एकाच नावाचे उमेदवार उभे करण्यात येत असतात. असाच प्रकार सांगली (Sangli) जिल्ह्यातील दोन मतदारसंघात पाहण्यास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधात विरोधकाकडून रणनीती करून मतांचे विभाजन होऊन प्रमुख उमेदवाराला याचा फटका बसावा म्हणून अशी शक्कल लढवली जात आहे. पण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आपला उमेदवार ओळखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघात एक सारख्या नावाचे अनेक उमेदवार उभे राहिल्याचे दिसून आले आहे. सांगलीमध्ये दिवंगत काँग्रेस नेते माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्याच्या नावाच्या दोन उमेदवार विरोधात उभे आहेत. तर तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात माजी गृहमंत्री दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा उमेदवार आहेत. तर रोहित पाटील या नावाने आणखीन तीन उमेदवार विधानसभामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.