सांगली : सांगली शहर आणि काही ग्रामीण भागात आज अवकाळी पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून तर उन्हाच्या कडाक्याने काहिली झालेल्या सांगलीकरांना (Sangli) काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसाने बेदाण्याला फटका बसण्याची शक्यता आहे. (sangli news Unseasonal rains coming today in Sangli)
मागील आठवड्यापासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील सर्वच शहरातील तापमान ४० अंश सेल्सीअसच्यावर गेले आहे. सकाळी अकरापासूनच उष्णतेच्या तिव्र झळा जाणवत आहेत. यामुळे अंगाची काहीली देखील होत आहे. यात अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने काहीसा गारठा जाणवत असला तरी उकाड्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बळीराजाला फटका
सांगली शहरात आणि काही ग्रामीण भागात आज सायंकाळी मध्यम स्वरूपात अवकाळी पाऊसाला सुरवात झाली. तर उन्हाच्या कडाक्याच्या काहिली झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसाने शेतकऱ्यांना (Farmer) फटका बसणार आहे. रॅकवर बेदाणे असतात त्यामध्ये पाणी साचून बेदाणा खराब होऊ शकतो. त्यामुळे बेदाण्याला फटका बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.