Sangli News
Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News: पुतणीला वाचवण्यासाठी काकाने विहिरीत मारली उडी अन् अनर्थ घडला; दोघांचाही दुर्देवी अंत

Priya More

Sangli Crime News: सांगलीमध्ये (Sangli) विहिरीत बुडून काका-पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायका घटना समोर आली आहे. विहिरीमध्ये पडलेल्या पुतणीला काका वाचवायला गेले. पण पुतणीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचा देखील मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कवठेमहांकाळ पोलिस (Kavatemahankal Police) ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अशी घडली घटना -

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या अग्रण धुळगाव येथे ही घटना घडली आहे. मनोज भास्कर शेसवरे आणि सौंदर्या वैभव शेसवरे या काका-पुतणीचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही शेसवरे मळा येथे राहत होते. सौंदर्या आणि तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाणी काढण्यासाठी त्या विहिरीमध्ये उतरल्या. कळशीत पाणी भरुन झाल्यानंतर सौंदर्या विहिरीमधून बाहेर येत होती. त्याचेवळी पायरीवरुन पाय घसरुन ती विहिरीमध्ये पडली.

वाचण्याचा प्रयत्न ठरला असफल -

सौंदर्या विहिरीमध्ये पडल्याने मुलीला वाचवण्यासाठी तिच्या आईने आरडाओरडा केला. आवाज ऐकून सौंदर्याचे काका मनोज शेसवरे हे विहिरीच्या दिशेने धावत आले. त्यांनी सौंदर्याला विहिरीमध्ये पडलेले पाहून तिला वाचवण्यासाठी त्यांनी विहिरीमध्ये उडी मारली. त्यांनी सौंदर्याला पाण्यातून बाहेर काढले. तिला उचलून विहिरीतून बाहेर आणत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा विहिरीमध्ये पडले.

दोघांचाही दुर्दैवी मृत्यू -

घाबरलेल्या सौंदर्याने काका मनोज यांना पाण्यामध्ये घट्ट मिठी मारली. यामुळे मनोज यांना हातपाय हलवता आलेच नाही. सौंदर्याला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे तिचे काका थकले आणि दोघेही पाण्यामध्ये बुडाले. आसपासच्या ग्रामस्थांनी दोघांना वाचवण्यासाठी विहिरीकडे धाव घेतली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेत विहिरीमध्ये बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसात मृत्यूची नोंद -

एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे शेसवरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर काका-पुतणीच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसानी मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे. श्रद्धाचे काका मनोज शेसवरे हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: रॉग साईंडनं आलेल्या ट्रकनं कारला चिरडलं; कारचा चुराडा

Beed News : गाढ झोपेतच मृत्यूने गाढले; अंगावरून डंपर गेल्याने २ तरुणांचा मृत्यू

Andaman Monsoon News | अंदमानात मान्सूनची हजेरी,नागरिकांना दिलासा!

IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

Health Tips: तुम्हाला पण आंबट ढेकर येत आहेत का? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT