Educational Crime: शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजवणारी बातमी; ५वी नापास असलेल्यांना दिलं १०वी पासचं सर्टीफिकेट, प्रकरण नेमकं काय?

Pune Educational Crime News : बोगस शाळांनंतर आता दहावी बोर्डाचे सर्टिफिकेट देणारी राज्यव्यापी टोळी सक्रिय झाली आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

अक्षय बडवे

Pune Educational Crime News : राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून आणखी एक घोटाळा समोर आलाय. दहावीच्या परीक्षेचे बोगस सर्टिफिकेट मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. बोगस शाळांनंतर आता दहावी बोर्डाचे सर्टिफिकेट देणारी राज्यव्यापी टोळी सक्रिय झाली आहे.(Educational Crime)

एका टोळक्याने पाचवी, आठवी आणि दहावी नापास असलेल्या तरुणांना दहावी पास असलेले गुणपत्रक व दहावी बोर्डाचे सर्टिफिकेट मिळवून दिले आहे. या संपूर्ण घटनेबाबत एका आरोपीला अटक केली असून. ५० ते ६० हजार रुपये घेऊन बोर्डाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या या टोळीने आत्तापर्यंत ३५ जणांना फसवल्याची माहिती मिळाली आहे.

Crime News
Pune Bangalore National Highway Accident: पुलाच्या कठड्यावरुन वेण्णा नदीत ट्रक कोसळला,चालकाची प्रकृती चिंताजनक

संदीप ज्ञानदेव कांबळे असे बनावट १० वी पासचे सर्टीफेट देणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्याच्या अन्य २ साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. पुण्यातील एका तरुणाला नोकरीची गरज असल्याचे ओळखून आरोपी संदीप कांबळे यांनी ६० हजार रुपयात दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रात दिले होते. आरोपीने 60 हजार रुपयांमध्ये पाचवी नापास असलेल्या तरुणांना दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट, मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट देत होता.

पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने आणखी ३५ लोकांना पैसे घेऊन फसवल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणात अनेक जण असल्याचा दावा पोलिसांनी केला असून हे सर्टिफिकेट कोणी वापरले असेल तर ते रद्द होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime News
Pune Crime News : खळबळजनक! मनसेतील बड्या नेत्याच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी; नेत्यांच्या मुलांना धमक्यांचे सत्र सुरूच

तसेच या संदर्भात शिक्षण मंडळाला देखील कळवण्यात येणार आहे. आधी TET, आरोग्य भरती, बोगस शाळा आणि आता थेट दहावी पास सर्टिफिकेटचा घोटाळा ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून (Pune) येणं दुर्दैवी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com