Pune Police Arrest Fake Police: मित्रांना किंवा मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना पुण्यात औंध परिसरातून समोर आली आहे. चक्क मित्र मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी एक तरुण पोलिसांचा ड्रेस परिधान करून फिरत होता. मात्र, त्याने अशी एक चूक केली आणि सगळ्या प्लान फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. (Latest Marathi News)
पुण्यात औंधमध्ये एका तरुणाने मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी पोलीस होण्याचं नाटक केलं.यावेळी त्याने पोलिसांचे कपडे घातले, टोपी, बॅच सगळं घातलं पण पायात बूट घालण्याचं विसरला. पायात चप्पल घालून फिरत असल्याने पोलिसांनी त्याला पाहिले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता सगळं बिंग फुटलं.
चौकशी केली असता मी औंध पोलिसांत नेमणुकीस असल्याचं सांगितलं. मात्र,त्याने जो ड्रेस घातला होता त्यावरून त्याच पितळ उघड पडलं.यशवंत रमेश धुरी (वय ३०, रा. तापकीर गल्ली, नडे कॉलनी, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतुरशुर्गी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Breaking Marathi News)
औंध परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांचे सहकारी आणि खाजगी वाहने पेट्रोलिंग करत होते.पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक पोलीस उभा असल्याचे दिसले.तो अनोळखी वाटल्याने त्याला गाडी थांबवून विचारल असता आपण औंध चौकीला पोलीस असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना शंका आली.
आपल्याच पोलीस चौकीतला पोलीस (Police) आणि आपल्यालाच माहित नाही.पोलिसांनी त्याचे निरीक्षण केले तर त्याच्या अंगावर ड्रेस तर होता, पायात चप्पल होती पण त्याने जो ड्रेस घातला होता त्यावर म.पो. आणि टोपीवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले आढळले.त्यावरून तो खोटे बोलत असल्याचे त्यांना समजले. त्यावरून पोलिसांनी अटक केली आहे.
या बनावट पोलिसांची अधिक माहिती घेतली असता, हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून आपल्या मित्र-मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी हा गणवेश घातल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या आरोपीने अजून कुठे कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.