Sangli News Two Brothers Drowned In Warna River Walwa Taluka Tandulwadi Village Shocking Incident
Sangli News Two Brothers Drowned In Warna River Walwa Taluka Tandulwadi Village Shocking Incident Saam TV
महाराष्ट्र

Sangli News: खेळायला जातोय सांगून वारणा नदीकाठी फिरायला गेले, परतलेच नाहीत; दोन सख्ख्या मावस भावांचा दुर्देवी अंत

विजय पाटील

Sangli News Today: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील वारणा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारस घडली.

या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अमोल प्रकाश सुतार (वय १६ वर्ष) आणि रविराज उत्तम सुतार (वय १२ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुळ कराड (Satara) तालुक्यातील राजमाची गावातील रहिवाशी असलेला रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे तांदुळवाडी (Sangali) गावात आला होता. आपला मावसभाऊ गावी आल्याने अमोलला खूप आनंद झाला. आता मौजमस्ती करून उन्हाळ्यातील सुट्ट्यांचा आनंद साजरा करायचा असं दोघांनी ठरवलं.

शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमोल आणि रविराज हे दोघेही वारणा नदीकाठी फिरायला गेले. यावेळी आपण नदीतून वैरण काढूयात म्हणून ते पाण्यात उतरले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुरळप पोलीस (Police) ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स यांच्या टीमला पाचारण करून अमोल आणि रविराज दोघांचेही मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढले. रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो सातवीत शिक्षण घेत होता. त्याचे आई वडील हे मोलमजुरी करून रविराजचं शिक्षण करत होते. मात्र, रविराजच्या अशा अचानक निघून जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. (Breaking Marathi News)

दुसरीकडे अमोल प्रकाश सुतार हा आई-वडिलांना एकूलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच असून त्याच्या निधनाने सुतार कुटुंबीयांवर डोंगर कोसळला आहे. दोन सख्ख्या मावस भावाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

SCROLL FOR NEXT