Sangli Police Saam tv
महाराष्ट्र

Sangli Police : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेमीमाईंड इंजेक्शनचा साठा जप्त; ६ जणांना अटक

Sangli News : तरुण वर्गात नशेखोरी वाढली असून नशा करण्यासाठी वेगवेगळ्या अंमली पदार्थ तसेच औषधींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सांगली शहरात पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले

विजय पाटील

सांगली : नशा आणि उत्तेजककेसाठी बेकायदेशीर वापरल्या जाणाऱ्या ट्रेमीमाईंड औषधी इंजेक्शनचा साठा सांगली पोलिसांनी जप्त करण्यात केला आहे. या कारवाईत दोन लाख पंधरा हजार किंमतीचे ५५८ इंजेक्शने बाटल्या जप्त करत पोलिसांनी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सांगली शहरात खळबळ उडाली आहे. 

नशा करण्यासाठी वेगवेगळ्या अमली पदार्थांचा वापर केला जात असतो. तर काही जण उत्तेजित द्रव्य घेऊन नशा करत असतात. प्रामुख्याने तरुणांकडुन नशा आणि उत्तेजक द्रव्य म्हणून ट्रेमीमाईंड औषधी इंजेक्शनचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सदरचे औषधी इंजेक्शन ऑनलाईन मागवून ते सांगली, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या ठिकाणी ज्यादा दराने विक्री करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

२ लाख रुपयांपेक्षा साठा जप्त 

दरम्यान याबाबत सांगली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. सांगली शहरातल्या पत्रकारनगर येथे औषधी इंजेक्शन तस्करी करताना संशयिताला पकडत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये ५५८ इंजेक्शन बाटल्या ज्याची किंमत २ लाख १५ हजार इतकी असून हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच सहा जणांना ताब्यात घेतले आहे. 

रस्त्यावर मद्य प्राशन करणाऱ्यांवर कारवाई 

छत्रपती संभाजीनगर शहरात भर रस्त्यावर दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरातील मध्यवर्ती क्रांती चौकात भर दिवसा वरदळीच्या वेळी दारू पीत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भररस्त्यात दारू पिणाऱ्या आणि दारू पिऊन असभ्य वर्तन करणाऱ्या शहरातील ९ ठाण्यांच्या हद्दीत ९४ जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Free: केंद्रानंतर राज्य सरकारनं दिली खुशखबर; आता 100 टक्के टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

Ulhasnagar News : धक्कादायक! उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुलींचं पलायन

Maharashtra Politics: फडणवीस सरकार अस्थिर करण्यामागे शिंदे? जरांगेंशी वाटाघाटीतून शिंदे दूर?

Karjat Muslim Township: मुंबईजवळ मुस्लिम टाऊनशिप वादात; मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस

Hill Station: शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग, स्वर्गाहूनी सुंदर 'हे' हिल स्टेशन पाहून मनाला पडेल भुरळ

SCROLL FOR NEXT