Leopard Attack : बाजारातून परत जाताना बिबट्याचा हल्ला; वृद्ध महिला गंभीर जखमी

Nandurbar Taloda News : नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असून पुन्हा एकदा दबा धरून बसलेल्या बिबटने रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेवर केलेल्या हल्ल्यात महिला जखमी केल्याची घटना
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. अशात पुन्हा एक बिबट्याकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. तळोदा येथून बाजार करून घरी परत जाणाऱ्या एका वृद्ध महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा सातपुड्याच्या डोंगर रांगांमद्ये वसलेला आहे. यामुळे या जंगल परिसरात वन्य प्राण्यांचे वास्तव्य पाहण्यास मिळते. तर शिकारीच्या शोधात वस्तीत येत बिबट्यांकडून हल्ला केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यात अनेकांचा जीव गेला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. तळोदा शहरापासून तीन किमी अंतरावर काझिपुर- तलावडी रस्ता दरम्यान घटना घडली आहे.

Leopard Attack
Hingoli : विद्यार्थ्यांची खाजगी संस्थेत आर्थिक पिळवणूक; प्रवेशासाठी २० हजार रुपये आकारल्याचा आरोप

तळोदा येथे गेल्या होत्या बाजाराला 

तळोदा तालुक्यातील काजीपुर तलावडी रस्त्यावर मंदिर जवळ बावी सांगल्या वळवी (वय ७०, रा. खुषगाव, ता. धडगाव) या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. बावी वळवी या कामानिमित्ताने शिरीष माळी यांच्या फुलांचा शेतात रखविलदार म्हणून काम करतात. त्या तळोदा येथे बाजार करण्यासाठी गेलेल्या होत्या. तळोदा येथून बाजार झाल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी पायीच निघाल्या होत्या.

Leopard Attack
Akkalkot News : पुराच्या पाण्यातून दुचाकी काढणे जीवावर बेतले; बोरी नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहून

सुदैवाने वाचला जीव 

पायी जात असलेल्या बावी यांच्यावर भररस्त्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालत हल्ला चढविला. मात्र रस्त्यावरून मोटरसायकलने ये जा करणाऱ्यांना बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी आवाज करत बिबट्याला हुसकून लावले. मात्र बिबट्याने वृद्धेच्या पायाचा पोटरीचा लचका तोंडुन जखमी केले आहे. त्यांच्यावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com