Sangali News  Saam TV
महाराष्ट्र

सांगली जिल्हा हादरला! आईसोबत ३ मुली कपडे धुण्यासाठी गेल्या आणि घात झाला

जत तालुक्यातील बिळुर येथील तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू झालाय.

विजय पाटील

Sangali News : सांगली (Sangali) जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. जत तालुक्यातील बिळुर येथील तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेने बिळूर आणि जत तालुक्यात शोककळा पसरली आहे. हा अपघात आहे की घातपात? हे अद्यापही समजलेलं नाही. (Sangali News Today)

सुनीता माळी (वय 30), अमृता माळी (वय 13), अश्विनी माळी (वय 10), ऐश्वर्या माळी (वय 7) असं मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकींची नावे आहेत. रविवारी रात्री उशीरा या चौघांचेही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जत तालुक्यातील बिळुर येथील सुनीता माळी या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलाव परिसरात गेल्या होत्या. रविवारी रात्री या चौघींचेही मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आले. (Maharashtra News)

दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आईसह तीन मुलींचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले असून हा अपघात आहे की घातपात याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT