विजय पाटील, सांगली|ता. १० डिसेंबर २०२३
सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (रविवार, १० डिसेंबर) उसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील (Sangli) ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनने (Swabhimani Shetkari Sanghtana) सांगलीती ल दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर धडक दिली. यावेळी कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करत कारखान्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरच थांबवले, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये झटापटीचा प्रकार देखील घडला . या ठिकाणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काटाबंदी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील असण्यात करण्यात आला आहे.
जयंत पाटील- राजू शेट्टींमध्ये जुंपली!
दरम्यान, ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. "ऊस दराच्या आंदोलनात प्रसिद्धीसाठी आमची नावे घेतली जातात.." अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली होती.
जयंत पाटील यांच्या या टीकेला स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनीही सडेतोड उत्तर दिले असून "जयंत पाटील यांचे नाव घेऊन चर्चेत येण्याइतकी माझी अधोगती झाली नाही, जयंत पाटलांनी आपले ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून हे धंदे बंद करावेत.." असा टोला त्यांनी लगावला आहे. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.