सांगली : कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरणी वसंतदादा साखर कारखान्यावर प्रदूषण मंडळाने कारवाई (Sangli News) केली आहे. याबाबत कारखाना बंद करण्याचे आदेश जारी करत पाणी आणि वीज तोडण्याचेची आदेश मंडळाने दिले आहेत. (Maharashtra News)
सांगलीच्या कृष्णा नदीतील मासे मृत्यू प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. मासे मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दत्ता इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टलरीं प्रकल्पानंतर आता थेट वसंतदादा साखर कारखान्यावरही कारवाई करण्यात आली आहे. साखर कारखाना बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जारी करण्यात आली असून ते कारखान्याचे (Sugar factory) वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचे हे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
महापालिकेवरही फौजदारी गुन्ह्याचा प्रस्ताव
त्याचबरोबर सांगली महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाकडे सादर करण्यात आले आहे. लवकरच त्याबाबत कारवाई होईल; अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.