Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण; पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी, शिंदेसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sangli News : दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने काही तरुणांचा सातत्याने होणारा त्रास, लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेने वादंग उठले आहे. संबंधित प्रकरणातील तपासावर दबाव आणला गेला असल्याचा संशय व्यक्त करत आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत; अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली आहे. 

सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील एका गावातील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने काही तरुणांचा सातत्याने होणारा त्रास, लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गंभीर व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसांत चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. घटना घडल्यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी हा विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. 

शिवसेना पहिल्या दिवसापासून आक्रमक 

दरम्यान पीडित मुलीला व तिच्या नातेवाइकांना न्याय देण्यासह दोषींवर कडक कारवाईची मागणी आमदार बाबर यांनी केली. त्याचवेळी आमदार सुहास बाबर यांनी या घटनेत कोणाचा हस्तक्षेप असल्याचे उजेडात आणण्यासाठी पोलिस निरीक्षकांचे कॉल डिटेल्स काढावे, अशी मागणीही केली होती. अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणातील दोषींचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनच भूमिका होती व आहे. 

आटपाडी पोलिसांना निवेदन 

दरम्यान आता या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनावर कोणाचा दबाव होता काय? ही वस्तुस्थिती उजेडात आणण्यासाठी गृहविभागाने व पोलिस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीतील कॉल डिटेल्स काढावे; अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेना प्रमुख मनोज नांगरे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी आटपाडी पोलिसांना दिले आहे. यावेळी विटा खानापूर येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Accident : मध्यरात्री परभणीत भीषण अपघात, ट्रक अन् ऑटोच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी

Shocking: जंगलात ओढत नेत मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांच्या तावडीतून पळाली; पण ट्रक चालकानेही अंगाचे लचके तोडले

धक्कादायक! एस्केलेटरमध्ये अडकलं तरुणाचं डोकं; VIDEO पाहून अंगावर शहारा येईल

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

PMC Recruitment: इंजिनियर झालात? पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT