Shaktipeeth Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Sangli : शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन; खासदार विशाल पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल

Sangli News : महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्यामुळे महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बाधीत शेतकर्‍यांनी १ जुलैला कृषी दिनाच्या दिवशीच भरपावसात अंकली येथे सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला

विजय पाटील

सांगली : राज्यात होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत रास्ता रोको केला जात आहे. अशात अंकली फाट्यावर रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून रास्तारोको केल्या प्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी लक्ष्मण जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

नागपूर- गोवा असा होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात देखील शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध असताना प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे. या महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी महामार्ग बाधीत शेतकर्‍यांनी १ जुलैला कृषी दिनाच्या दिवशीच भरपावसात अंकली येथे सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला. 

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा 

या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजुने वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून रास्ता रोको करत वाहतूक ठप्प केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये खासदार विशाल पाटील यांच्यासह ४० ते ५० व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

लातूरमध्ये आजही मोजणी रोखली 
शक्तिपीठ महामार्गाला लातूरमधून आजही विरोध करण्यात आला आहे. यात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखले आहे. लातूरच्या मोरवड, मोटेगाव, चाडगाव या शहरात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत. शक्तिपीठ महामार्गा साठी मोजणी करू देणार नाही आणि शेती देखील देणार नाही अशी भावना शेतकऱ्यांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे ब्रिटीशकालीन धरण ९२ टक्के भरलं, पाणीचिंता मिटणार?

SCROLL FOR NEXT