Raju Shetti Vs Sadabhau Khot:  Saamtv
महाराष्ट्र

Sadabhau Khot: माझं काय चुकलं? पराभवानंतर राजू शेट्टींचा सवाल, सदाभाऊ खोत यांचे खोचक प्रत्यूत्तर; म्हणाले, 'जनतेने थर्ड क्लास...'

Raju Shetti Vs Sadabhau Khot: लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पराभव स्विकारावा लागला. हा पराभव राजू शेट्टी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून माझं काय चुकलं? अशी भावुक पोस्ट केली होती. या पोस्टवर सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले आहे.

विजय पाटील

सांगली, ता. १२ जून २०२४

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पराभव स्विकारावा लागला. हा पराभव राजू शेट्टी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून माझं काय चुकलं? अशी भावुक पोस्ट करत त्यांनी शेतकऱ्यांना सवाल विचारला होता. राजू शेट्टी यांच्या या पोस्टवर आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातुन पराभव झाल्या नंतर राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली. "माझं काय चुकलं" यावर सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. "राजू शेट्टींना प्रचंड अहंकार आलेला होता. स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वच पक्षाचे उंबरठे झिजवले. कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला केले. मात्र जनतेने ते ओळखले आणि त्यांना जनतेने थर्ड क्लास दाखवले आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

"राजू शेट्टींना प्रचंड अहंकार आलेला होता. चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला करायचे त्यांना अपमान जनक वागणूक द्यायची, त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचायचं, बदनाम करायचं गटकारस्थान करायचं हे करत आल्यामुळे जीवाभावाचे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून लांब गेले. आणि मी काय गुन्हा केला. त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत," असे सदाभाऊ खोत म्हणाले.

"आंदोलन करत असताना आमची चळवळ प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभी केली होती. पण भाजपबरोबर युती असताना स्वतःच्या स्वार्थासाठी ती युती तोडून शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यावर मग सगळ्या पक्षांचे उंबरठे त्यांनी झिजवलेले आहेत. म्हणून जनतेने त्यांना थर्ड क्लास दाखवलेले आहे, अशी जहरी टीका खोत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT