Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Miraj News : पुष्पा स्टाईल सुगंधी तंबाखूची वाहतूक; दोघांना अटक, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangli News : अंमली पदार्थ, तंबाखू, गुटखा वाहतूक व विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची वाहतूक करून त्याची सर्रास विक्री केली जात असते

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या मिरजे मध्ये पुष्पा सिनेमा स्टाईल अवैध सुगंधी तंबाखूची वाहतुक करत विक्रीचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. तब्बल एक लाखाच्या सुगंधी तंबाखूसह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ, तंबाखू, गुटखा वाहतूक व विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची वाहतूक करून त्याची सर्रास विक्री केली जात असते. पोलिसांकडून अनेकदा कारवाई केल्यानंतर देखील अंमली पदार्थांची वाहतूक व विक्री थांबत नाही. अशाच प्रकारे सांगली जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

पोलिसांची छापा टाकत कारवाई 
दरम्यान मिरजेतील नागपूर- रत्नागिरी महामार्गावरील निलजी बामणी दरम्यान पुलाखाली प्रतिबंधीत असणारा तंबाखूचा साठा ट्रकमधून खाली उतरवण्यात येत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकत अवैध सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत साधारण १ लाख रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा सापडला आहे. 

शेतीलाच्या पोत्यांआडून वाहतूक 

हा सुगंधित तंबाखूची वाहतूक पुष्पा चित्रपटातील दृश्याप्रमाणे लिंबू आणि इतर शेतीमालाच्या पोत्याच्या आडून केली जात होती. कर्नाटक मधून हा अवैध सुगंधी तंबाखू साठा मिरजेमध्ये आणण्यात आला होता. ही सर्व अवैध सुगंधी तंबाखू मिरज आणि कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात विक्री करण्यात येणार होता. यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत माल जप्त करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट

Shikakai Benefits : केस गळती थांबवण्यासाठी आजीबाईंचं जुनं रसायन; वाचा शिकेकाईचे फायदे आणि वापरण्याची योग्य वेळ

Youth Mental Health: डिजिटल डिव्हाईसच्या अतिवापराने तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?

Rahul Gandhi : माझ्याकडून मोठी चूक झाली; राहुल गांधी यांनी भर सभेत मान्य केलं, नेमकं काय म्हणाले? VIDEO

पांडवकडा धबधब्यावर तरुण अडकला, मदतीसाठी याचना, कसा वाचला जीव, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT