Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

Sangli News : ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याच रस्त्यावर वर्तुळामध्ये चांदणीची आकृती रेखाटून त्यामध्ये लिंबू व कुंकू टाकण्यात आले होते. लिंबूत खिळे देखील घुसविण्यात आले

विजय पाटील

सांगली : आजच्या धकाधकीच्या व यांत्रिकीकरणाच्या युगात देखील अंधश्रध्येतून विचित्र असे प्रकार केले जात असल्याचे पाहण्यात मिळत आहे. अर्थात नागरिकांमध्ये भीती निर्माण केली जात असते. अशाच अंधश्रध्येतून मिरज तालुक्यातील टाकळी येथे भररस्त्यावर खिळे ठोकून लिंबू व गुलाल टाकण्याचा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून भीती देखील पसरली आहे. 

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार करण्यात आला आहे. गावातील भर रस्त्यावर अंधश्रद्धेचा हा प्रकार दिसून आला. रस्त्यावर चांदणीच्या आकाराची आकृती काढून त्यात लिंबू व कुंकू टाकून तसेच लिंबूत खिळे मारून उतारा टाकला होता. हा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या प्रकाराने टाकळी गावात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण 

दरम्यान ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याच रस्त्यावर वर्तुळामध्ये चांदणीची आकृती रेखाटून त्यामध्ये लिंबू व कुंकू टाकण्यात आले होते. लिंबूत खिळे देखील घुसविण्यात आले होते. सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी गावातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आले.

तरुणाने लिंबू कापून त्याचे सरबत करून पिले

दरम्यान हा अंधश्रद्धेचा प्रकार गावातीलच एका तरुणाने मोडून काढला. येथे खिळे घुसवून व कुंकू लावून टाकण्यात आलेले लिंबू घेऊन तरुणाने ते स्वच्छ धुतले. लिंबू कापून पाण्यामध्ये पिळून त्याचे सरबत बनवत पिऊन टाकले. अशा प्रकाराने माणसाच्या जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. अशा गोष्टींना कोणीही घाबरू नये, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये दाखल, आंदोलनाला सुरुवात

पैशांची चणचण दूर करेल पिवळ्या चपातीचा 'हा' सोपा उपाय, महिनाभरातच व्हाल धनवान

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांवर पोहोचले; २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Amravti : धक्कदायक! हत्या केली, मृतदेह पेट्रोल टाकून जाळला; मावस भावानेचं केली बहिणीची निर्घुण हत्या

Mumbai Local Update: हार्बर मार्गावर 'अप' आणि 'डाऊन' लोकल ठप्प; प्रवाशांचे मेगाहाल

SCROLL FOR NEXT