Sillod Nagar Parishad : सिल्लोड नगरपालिका मतदार यादी वादात; अनेक मतदारांची नावे अन्य वॉर्डात गेल्याचा आरोप

Sambhajinagar News : २०१९ मध्ये नगर परिषद निवडणुकीत एकूण ८०० आक्षेप घेण्यात आले होते. त्या तुलनेत यावेळी १५१९ आक्षेप आले असून आक्षेप घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढली आहे अजूनही आक्षेप वाढण्याची शक्यता
Sillod Nagar Parishad
Sillod Nagar ParishadSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादी प्रारूप आराखड्यावर १ हजार ५१९ आक्षेप दाखल झाले होते. अनेक मतदारांची नावे दुसऱ्या वॉर्डात गेल्याचे आक्षेप भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतले असल्याने सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी आता वादात अडकण्याची शक्यता आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम आगामी काळात पाहण्यास मिळणार आहे. त्या अनुषंगाने तयारी सुरु आहे. वॉर्ड रचना तयार झाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना आखण्यात येत आहेत. सिल्लोड नगर परिषदेच्या मतदार याद्या तयार झाल्या असून यावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वाधिक ८५० मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागातून टाकल्याचे आक्षेप भाजपचे जिल्हा सचिव कमलेश कटारिया यांनी दाखल केले आहे. 

Sillod Nagar Parishad
Cyber Crime : पहलगाम हल्ल्यात बँकेतून व्यवहार, डिजिटल वॉरंट दाखवत धमकी; वृद्धाला १९ लाखाचा गंडा

भाजप पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप 

दरम्यान गतवेळी त्यांचा ८३ मतांनी पराभव झाला होता. तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर यांनी १५० आक्षेप दाखल केले आहेत. आणखी ६०० मतदारांवर ते आक्षेप दाखल करणार आहेत. त्यात त्यांच्या वॉर्डातील काही नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याचे व काही नावे त्यांच्या प्रभागात आल्याचे आक्षेप दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे सिल्लोड शहर मंडळ अध्यक्ष मनोज मोरेल्लू यांनी प्रभाग क्रमांक ४ मधील ८५ नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याचे आक्षेप घेतले आहे. 

Sillod Nagar Parishad
Nanded Crime : यात्रेकरू चहा पिण्यासाठी हॉटेलवर थांबताच चोरट्याने साधला डाव; दागिन्यांसह रोख रक्कम असलेली पर्स घेऊन पसार

आतापर्यंत १५१९ आक्षेप 

२०१९ मध्ये नगर परिषद निवडणुकीत एकूण ८०० आक्षेप घेण्यात आले होते. त्या तुलनेत यावेळी १५१९ आक्षेप आले असून अजूनही दाखल होण्याची शक्यता आहे. प्रभाग ८ मध्ये सर्वाधिक आक्षेप असून त्यात एकूण ४०० मतदान वाढले आहे. आक्षेप घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आणखी आक्षेप वाढण्याची शक्यता आहे. आक्षेप घेणाऱ्यांमध्ये भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, प्रशांत चिनके, शहर चिटणीस मधुकर राऊत, शिंदेसेनेचे सुधाकर पाटील, कृणाल सहारे, प्रशांत क्षीरसागर, सुदर्शन अग्रवाल यांच्यासह अनेकांनी आक्षेप नोंदविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com