Sangli Rain Saam tv
महाराष्ट्र

Sangli Rain : जत पूर्व भागामध्ये पावसाने पिकांची हानी; हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त

Sangli News : सततच्या पावसाने पिकांचे आधीच नुकसान झाले असून आठवडाभर चाललेल्या मुसळधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचले आहे. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका

विजय पाटील

सांगली : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन हानी झाली आहे. प्रामुख्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पूर्व भागात मागील आठवडाभर पाऊस सुरू आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका बसला आहे. यात डाळींब, बाजरी, भुईमूंग व तूर पिकांची मोठी हानी झाली आहे. 

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. बोरनदी दुथडी वाहत असल्याने पूरसदृश स्थिती आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बांध फुटले असल्याने उभ्या पिकात, फळबागेत पाणी थांबले आहे.

हजारो हेक्टर क्षेत्रात पाणीच पाणी 
बोर्गी, बालगाव येथे तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने बोर नदी दुथडी भरून वाहत आहे. मोरबागी, गिरगाव, माणिकनाळ, सुसलाद, सोनलगी येथे मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने कांदा, मका पिकाचे नुकसान झाले आहे. जत पूर्व भागात गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रातील मका, तूर, बाजरी शेती पिकांचे तर डाळिंब द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

द्राक्ष बागांचे मोठे नुकसान 

उमदी भागात अनेक घरांची पडझड देखील झाली आहे. यावर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून मका, तूर, भुईमूग, मूग, बाजरी पिकांची पेरणी केली. यावर्षी तरी चांगले पीक येईल आणि मागील कर्ज फिटेल; या आशेने शेतकरी होते. मात्र परतीच्या पावसाने सगळेच नष्ट केले आहे. तर जत तालुक्यात आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime : सोशल मिडीयावरील ओळखीतून विवाहबाह्य संबंध; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या

Ankita Walawalkar Photos: 'रूपाची खान, दिसते छान' अंकिता वालावलकरचं सौंदर्य

Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

SCROLL FOR NEXT