Madha Flood : माढ्यातील पूरग्रस्त मदती पासून वंचित; लोंढेवाडी येथील कुटुंब तीन दिवसांपासून उपाशी

Madha News : सीना नदीच्या पुरामुळे अनेक भागात विदारक परिस्थिती निर्माण झाली असून पुरानंतरची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तालुक्यातील लोंढेवाडी येथील पूरग्रस्थ शेतकरी सचिन सावंत यांच्या घरी साम टीव्ही पोहचली
Madha Flood
Madha FloodSaam tv
Published On

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात पिक आणि घरातील संसारोपयोगी साहित्य आणि अन्नधान्य वाहून गेले आहे. येथील शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरू लागले आहे. मात्र या भागातील पूरग्रस्त मदतीपासून अजूनही वंचित आहेत. 

सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. पूरस्थिती आता ओसरत असून आता येथील पूरग्रस्तांची धडपड सुरू आहे. पुरा नंतरची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथील पूरग्रस्थ शेतकरी सचिन सावंत यांच्या घरी साम टीव्ही पोहचली आणि येथील परिस्थिती जाणून घेतली आहे. 

Madha Flood
Mumbai : ट्रॉमा केअरमध्ये दोन दिवस मृतदेह पडून; बीएमसी प्रशासन झोपेत, सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा

शेतकऱ्याचे १२ लाखांचे नुकसान 
सचिन सावंत यांच आठ जणांचा कुटुंब आहे. तीन दिवस त्यांच्या घरात सहा ते सात फुट पाणी आले होते. पुराच्या पाण्यामुळे चाळीस पोती मक्याची कणसे वाहून गेली आहेत. पाच ते सहा लहान मोठी जनावरे वाहून गेली आहेत. पुरामुळे त्यांचा दुग्ध व्यवसाय ही ठप्प झाला आहे. पुरामुळे सावंत यांचे सुमारे दहा ते बारा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून न निघणारे आहे. 

Madha Flood
Leopard Attack : घरात अभ्यास करत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

कुटुंबीय तीन दिवसांपासून उपाशी 

दरम्यान पुरात घरातील साहित्य, अन्नधान्य वाहून गेले आहे. अशी परिस्थिती असताना देखील कोणतीही मदत पोहचली नसल्याने सावंत कुटुंब हे तीन दिवसांपासून उपाशी आहे. त्यांच्यापर्यंत अद्याप कोणतीही मदत पोचली नाही. सरकार आणि सेवाभावी संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची गरज आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com